घरमनोरंजनवरुणचे एक ट्विट, अन् ट्रोलिंग आर्मी सक्रीय

वरुणचे एक ट्विट, अन् ट्रोलिंग आर्मी सक्रीय

Subscribe

एका ट्रोलिंगचा शिकार बॉलिवूड अभिनेता वरुण धवन झाला आहे. वरुण सध्या त्याच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा ट्रेंड सुरु आहे. आणि या ट्रोलिंगलाही सेलिब्रिटिजनी सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अनेकदा युजर्स कुठलीही पडताळणी न करता ट्रोलिंग करत असतात आणि त्यामुळे खोट्या अफवा पसरवल्या जातात. अशाच एका ट्रोलिंगचा शिकार बॉलिवूड अभिनेता वरुण धवन झाला आहे. वरुण सध्या त्याच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण यादरम्यान तो सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. मात्र सध्या त्याने केलेल्या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार ट्रोलिंग केलं आहे. सध्या देशभरात कोरोना व्हायरसचने धैमान घातले आहे. ज्याची झळ बॉलिवूडलाही बसली आहे. अनेक ठिकाणी चित्रपटआणि मालिकांचे चित्रीकरण करण्यावरही बंदी घातली आहे. अशातच वरुण धवन मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये आगामी चित्रपट ‘भेडिया’ चे शूटिंग करत आहे. नुकतच त्याने एक ट्विट केले होते ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यानंतर त्याने हे ट्विट डिलिट केले होते. वरुणने ट्विटरवर एक ग्राफिक शेअर केले होते. ज्यात तो वेगवेगळ्या आवतारात दिसत होता. हे ग्राफिक त्याच्या एका चाहत्यानं त्याला पाठवलं होतं. पण काही वेळातच वरुणला हे ग्राफिक ट्विटरवरून डिलिट करावं लागलं. ‘प्लाझ्मा दान करा आणि जीव वाचवा.’

वरुणनं हे ग्राफिक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर युझर्सनी या पोस्टच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत त्याला ट्रोल केलं. कारण जेव्हा सोशल मीडियावर ऑक्सिजन, औषध आणि हॉस्पिटल बेड यांची कमतरता अशा विषयांवर बोललं जात आहे त्यावेळी ही पोस्ट करण्यात आली होती. वरुणच्या या ट्वीटवर टीका करताना एका युझरनं लिहिलं, ओह वरुण मला वाटलं होतं की, तू एक समजदार व्यक्ती आहेस. यावर वरुण सुद्धा या युझरला उत्तर दिलं आहे. त्यानं लिहिलं, ‘मी हे फक्त त्याच्यासाठी केलं ज्यानं हे ग्राफिक तयार केलं आणि मला पोस्ट करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. पण आता मला वाटतं हे मीडियम आता यासाठीही वापरलं जाऊ नये.’ असे म्हणत वरुणनं ते ग्राफिक्सचं ट्वीट डिलीट केलं. सध्या अनेक बॉलिवूड कलाकार हे विविध देशांत फिरायला जात आहेत. वरुणही त्याची पत्नी नताशा दलालसह मुंबई एअरपोर्टवर स्पॉर्ट करण्यात आलं होते त्यावरही नेटकऱ्यांनी ट्रोलिंग करायला सुरुवात केली होती.

- Advertisement -

हे वाचा- Amazon prime video: आगामी रियालिटी शो “LOL-हँसे तो फसे”चा ट्रेलर रिलीज !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -