Viral : कांदा रडवेल पण हे मिम्स पोट धरून हसवतील

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या दरवाढीने मात्र डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याचा भाव तब्बल १०० रुपये किलोच्या घरात गेला असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोसळले आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी देशभरात आंदोलने केली. परिणामी देशातच विकावा लागणारा कांदा आता नागरिकांना रडवत आहे. एकीकडे कांद्याच्या दरवाढीमुळे डोळ्यात पाणी आले असताना सोशल मीडियावर मात्र ही दरवाढ चांगलीच ट्रेंडींग होत आहे. बॉलीवूड चित्रपटांच्या संवादावर मजेशीर मिम्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. कांदा दरवाढ कसा रडवतोय, असे चित्रण या मिम्समधून पाहायला मिळते. काहींही ट्विटरच्या माध्यमातून हे पोस्ट व्हायरल केले असून सध्या या मिम्सची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा –

कोरोनाची लसही बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात