घरक्राइमonline shopping : व्हिस्की खरेदी करणं पडलं महागात ; दादरमधल्या ७४...

online shopping : व्हिस्की खरेदी करणं पडलं महागात ; दादरमधल्या ७४ वर्षीय अभिनेत्रीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Subscribe

हल्ली सर्रास ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे आपण पाहतो. ऑनलाईन शॉपिंगसाठी गुगलवर मोबाईल नंबर शोधून ऑनलाईन ऑर्डर न करण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून सतत केले जाते,मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.याच पार्श्वभूमीवर एका हिंदी सिरीयलमधील अभिनेत्रीची अशाचप्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.हिंदी सिरीयलमधील ही अभिनेत्री ७४ वर्षाची असून, ती दादरमध्ये राहणारी आहे. ऑनलाईन शॉपचा कर्मचारी असल्याचे भासवून एका सायबर गुन्हेगाराने या अभिनेत्रीची ३.०५ लाखांची फसवणूक केली आहे.

या अभिनेत्रीच्या पुतण्याचे लग्न ठरल्यामुळे तिने आपल्या पुतण्यासाठी पार्टीचे आयोजन केले. या पार्टीनिमित्त तिची अमृत व्हिस्कीची बॉटल गिफ्ट करण्याची इच्छा होती त्यामुळे या अभिनेत्रीने या भेटवस्तूसाठी गुगलवर वाईन शॉपचे नंबर शोधायला सुरुवात केली आणि त्या गुगल वेबसाईटवरच तिला दोन नंबर मिळाले आणि हा सर्व प्रकार घडला, अशी माहिती या अभिनेत्रीने पोलिसांना दिली.

- Advertisement -

अभिनेत्रीने या दोन नंबरपैकी एका मोबाईल नंबरवर कॉल केला आणि व्हिस्कीसाठी ४,८०० रुपये दिले, मात्र त्या नंबरवरुन कोणतीही डिलिव्हरी तिला मिळाली नाही. डिलिव्हरी न आल्यामुळे तिने पुन्हा त्या नंबरवर कॉल करुन आपले पैसे परत मागितले. पण समोरील व्यक्तीने या अभिनेत्रीला कोणतेही रिफंड मिळवण्यासाठी सरकारी नियमांनुसार वाईन शॉपमध्ये तिला ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले,आणि त्यानंतर त्या अभिनेत्रीच्या डेबिट कार्डचे तपशील घेतले आणि वनटाईम पासवर्ड जनरेट केला. अभिनेत्रीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्याने शेअर करण्यास सांगितला. हा या ऑनलाईन प्रक्रियेचा भाग असल्याचे समजून अभिनेत्रीने हा ओटीपी फोनवरील व्यक्तीला शेअर केला.

अशा प्रकारे त्याने अनेक ऑनलाईन व्यवहार केले आणि अभिनेत्रीच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर करुन घेतली.आरोपीने नंतर तिच्या डेबिट कार्डमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे सांगत एकंदरीत अभिनेत्रीचे ३:०५ लाख रुपयांची फसवणूक केली.मग तिने समोरील व्यक्तीला बऱ्याचदा फोन केले, मात्र त्याने रिसिव्ह केले नाही.त्यानंतर फोन लगेच बंद करण्यात आला. या अभिनेत्रीने अखेर दादरमधील शिवाजी पार्कमधील पोलिस ठाण्यात याप्रकरणाबाबत तक्रार नोंदवली

- Advertisement -

 


हे ही वाचा – Winter Session : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबरपर्यंत होणार – ॲड. अनिल परब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -