घरमनोरंजनबाबुची अर्बन डिक्शनरी

बाबुची अर्बन डिक्शनरी

Subscribe

हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपट असे दोन गट होते. भाषिक चित्रपटातील एखाद दुसरा कलाकार हा हिंदीमध्ये काम करताना दिसत होता. दक्षिणेकडील कलाकारांना इथे फारसे स्थान नव्हते. भाषेची अडचण म्हणून कोणी कलाकार हिंदीकडे फिरकत नव्हता. आता मात्र सोशल नेटवर्कच्या माध्यमातून छोटे-मोठे कलाकारही कळू लागलेले आहेत. महेशबाबू हा दक्षिणेकडचा बर्‍यापैकी नाव मिळवून असलेला कलाकार आहे. तेलगू चित्रपटांत त्याला मानाचे स्थान आहे. काही शौकिनांनी ‘ऑनलाईन अर्बन डिक्शनरी’ अपडेट केलेली आहे. त्यात महेशबाबू यांचे नाव टाईप केल्यानंतर भारतातील देखणा नायक म्हणून त्याच्याविषयी वाचायला मिळते.

साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी या डिक्शनरीमध्ये बाबूच्या नावाची नोंद झाली होती. पुढे राजकुमार म्हणूनही त्याला संबोधले गेले आणि आता सोशल नेटवर्कवर त्याचा विषय अधिक चर्चेचा झालेला आहे. महाराष्ट्रातही बर्‍यापैकी त्याची कुजबूज वाढू लागलेली आहे. त्याला कारण म्हणजे अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही त्याची पत्नी आहे. या परिभाषेला महेशबाबू फारसे काही महत्त्व देत नाही. सध्या अनेक चित्रपटांमध्ये तो व्यस्त आहे. वर्ष अखेरीस त्याचे चित्रपट प्रदर्शित होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -