घरमनोरंजनदोन वर्षांपूर्वी थोडक्यात संधी हुकली, पण अखेरिस वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार...

दोन वर्षांपूर्वी थोडक्यात संधी हुकली, पण अखेरिस वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळवलाच

Subscribe

दोन वर्षांनंतर वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. 'आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023'मध्ये वीर दासने पुरस्कार आपल्या नावे करत भारताचा झेंडा रोवला आहे. वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : 2021 मध्ये अभिनेता आणि विनोदवीर असलेल्या वीर दास याला त्याच्या ‘टू इंडिया’ या विनोदी कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. परंतु, तेव्हा तो हा पुरस्कार जिंकू शकला नव्हता. मात्र, आता दोन वर्षांनंतर वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023’मध्ये वीर दासने पुरस्कार आपल्या नावे करत भारताचा झेंडा रोवला आहे. वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार देण्यात आला आहे. नेटफ्लिक्सच्या ‘वीर दास लँडिंग’ या कार्यक्रमासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारावर वीर दासने आपले नाव कोरले आहे. (opportunity narrowly missed out two years ago, but Veer Das finally bagged an International Emmy Award)

हेही वाचा – तमन्ना भाटिया-विजय वर्मा लवकरच करणार लग्न? व्हायरल फोटोमुळे चर्चा

- Advertisement -

यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारात तीन भारतीयांना नामांकन मिळाले होते. यांत अभिनेत्री शेफाली शाह, वीर दास आणि जिम सर्भ यांची नावे होती. अभिनेत्री शेफाली शाह यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. तर, जिम सर्भला ‘रॉकेट बॉइज 2’ या सीरिजमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये नामांकन जाहीर झाले होते. पण वीर दासचा नेटफ्लिक्सवरील ‘वीर दास : लँडिग’ हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण शेफाली शाहचा पुरस्कार हुकल्याने तिच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर वीर दासने याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना वीर दासने सांगितले आहे की, “हा क्षण खरचं खूप कमाल आहे. सगळचं स्वप्नवत आहे. ‘कॉमेडी कॅटेगरी’मध्ये ‘वीर दास: लँडिंग’साठी एमी पुरस्कार जिंकणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ‘वीर दास: लँडिंग’चे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.” ‘एमी पुरस्कार 2023’ हा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी एकता कपूर यांना खास आमंत्रण देण्यात आले होते.सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वीर दाससोबत या शर्यतीत फ्रान्सचा फ्लैम्ब्यू, अर्जेंटीनाचा एल एनकारगाडो आणि यूकेच्या ‘डेरी गर्ल्स सीझन 3’चा समावेश होता. आता वीर दासला पुरस्कार मिळाल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -