घरमनोरंजनअबराम शाहरुख खान

अबराम शाहरुख खान

Subscribe

सिने कलाकारच नाहीत तर उद्योग, क्रीडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलांच्या कार्याची दखल प्रसिद्धी माध्यमांनी नेहमीच घेतलेली आहे. आता तर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून या मुलांची छबी सर्वदूर पसरू लागलेली आहे. किंग खान शाहरुख खान याच्या कुटुंबाविषयी त्याच्या फॅनमध्ये नेहमी चर्चा राहिलेली आहे. चित्रपटाचे डबिंग करण्यापासून तर ते मॉडेलिंग करण्यापर्यंत शाहरुख खानच्या मुलाने पुढाकार घेतलेला आहे. अबराम हा शाहरुख खानचा लहान मुलगा. त्याचे दिसणे, वागणे यामुळे तोही सतत चर्चेत राहिलेला आहे. आता त्याचे नाव आठवण्याचे कारण म्हणजे सध्या काळा घोडा इथे जो महोत्सव आयोजित केलेला आहे त्यात स्वीडन कॉन्स्युलेट या संस्थेने छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. त्यात शाहरुखबरोबर अबराम चे मोहक छायाचित्र पहायला मिळते. ‘स्वीडिश डॅडस्-इंडियन डॅडस्’ असे नाव या दालनाला दिलेले आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत छायाचित्रांचे हे प्रदर्शन सर्वांना पहाता येईल.

सर्वच देशांची रचना ही मानवी विचारांप्रमाणे आणि कार्यरत असलेल्या सत्ताधारींच्या निर्णयाप्रमाणे केली गेलेली आहे. बर्‍याचशा देशांत पुरुषी वर्चस्व असले तरी कुटुंबात मात्र मुलांनी आईला श्रेष्ठत्वाचे स्थान दिलेले आहे. कर्तृत्वाचा, भावूकतेचा विचार येतो त्यावेळी मातृत्त्व किती श्रेष्ठ आहे हेच सांगितले जाते. यातून वडिलांच्या नावे जी आपुलकीची भावना व्यक्त करायला पाहिजे ती आजही पुरेशा प्रमाणात झालेली नाही. स्वीडन देशात मात्र पितृत्त्वाला मानाचे स्थान आहे. भारतात त्याचेही प्रतिबिंब उमटावे यादृष्टीने वडील आणि मुलगा यांच्या नात्याचे दर्शन घडावे या उद्देशाने हे प्रदर्शन भरवलेले आहे. त्यात शाहरुख आणि त्याचा मुलगा अबराम सर्वांचे लक्ष वेधून घेतो. स्वीडनच्यावतीने जॉहन बेव्हमन आणि भारताच्यावतीने अविनाश गोवारीकर यांनी ही छायाचित्रे टिपलेली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -