Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'या' कारणावरून उषा मंगेशकर सोनाक्षी सिन्हावर नाराज

‘या’ कारणावरून उषा मंगेशकर सोनाक्षी सिन्हावर नाराज

Subscribe

सत्तरच्या दक्षकात गाजलेलं गाण 'मुंगडा' याचे रिमिक्स नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याच्या गायीका उषा मंगेशकर यांनी मात्र रिमिक्सवर आक्षेप व्यक्त केला आहे.

सत्तरच्या दक्षकात गाजलेले ‘मुंगडा’ या गाण्याचे रिमिक्स नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नाचताना दिसणार आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याच्या गायिका उषा मंगेशकर यांनी या रिमिक्सवर आक्षेप व्यक्त केला आहे. पिंक व्हिला या वेबसाइटने हा दावा केला आहे. उषाम मंगेशकर या सोनाक्षी सिन्हावर नाराज असल्याची माहिती वेबसाइटने दिली आहे. आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ या चित्रपटासाठी ‘मुंगडा’ गाण्याचे रिमिक्स तयार करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उषा मंगेशकर यांनी १९७७ साली हे गाणे गायले होते. या गाण्यात हेलन यांनी डान्स केला होता. त्यावेळी नाही तर आजही हे गाणे लोकांमध्ये प्रिय आहे.

काय म्हणाल्यात उषा मंगेशकर

- Advertisement -

“गाण्याचे रिमिक्स बनवण्याचा मी विरोध करते. आम्ही उत्तम विचार आणि कठिण परिश्रमाने गाणे बनवले होते. त्यांचे रिमिक्स बनवणे ही चुकीची गोष्ट आहे.” – गायिका, उषा मंगेशकर

लोकांना दिल्या अशा प्रतिक्रिया

सोनाक्षीच्या या नवीन गाण्यावर लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहे. सोनाक्षीचा बोल्ड अवतार लोकांना आवडला नसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

- Advertisment -