घरताज्या घडामोडीOscar 2022: ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची आज घोषणा, 'या' चित्रपटांकडून भारताला अपेक्षा

Oscar 2022: ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची आज घोषणा, ‘या’ चित्रपटांकडून भारताला अपेक्षा

Subscribe

ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची यादी tracee Ellis आणि Leslie Jordan घोषित करणार आहे. Oscars.com या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही हा सोहळा लाइव्ह पाहू शकता.

चित्रपट क्षेत्रात मानाचा समजला जाणारा एकमेव अवॉर्ड म्हणजे ऑस्कर अवॉर्ड (Oscar Award 2022 )  ९४व्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड साइंसेज नॉमिनेशन यादीची घोषणा आज केली जाणार आहे. ऑस्करच्या यादीत सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, चित्रपट , निर्माता अशा वेगवेगळ्या कॅटगरीसाठी नॉमिनेशन यादी जाहीर होणार आहे. २७ मार्चला ऑस्कर अवॉर्ड सोहळा रंगणार आहे. भारतातील महत्त्वाचे दोन चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असून या चित्रपटांकडून भारताला प्रचंड अपेक्षा आहेत.

कुठे पाहाल ऑस्कर अवॉर्ड ?

- Advertisement -

ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची यादी tracee Ellis आणि Leslie Jordan घोषित करणार आहे. Oscars.com या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही हा सोहळा लाइव्ह पाहू शकता. त्याचप्रमाणे Oscars.org या अधिकृत युट्यूब चॅनेलवरही पाहू शकता. भारतीय वेळेनुसार, मंगळवारी संध्याकाळी ६:४८ वाजता ऑस्कर अवॉर्डच्या नॉमिनेशनची यादी जाहीर केला जाणार आहे.

‘हे’ भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

- Advertisement -

यंदा ऑस्कर अवॉर्डसाठी 276 चित्रपटांची यादी तयार करण्यात आली आहे. ब्लॉकबस्टर Spider Man: No Way Home आणि No Time to Die या चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आहेत. त्याचप्रमाणे भारताकडून मोहन लाल स्टारर एक्शन एडवेंचर चित्रपट ‘मरक्कर: द लॉयन ऑफ द अरेबियन सी’ (Marakkar: The Lion of the Arabian Sea) आणि सूर्या (surya) स्टारर ‘जयभीम’ (JaiBhim ) हे तमिळ चित्रपट शॉर्टलिस्ट ऑस्करच्या शर्यतीत असून या चित्रपटांकडून भारताच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

94व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्व पात्र चित्रपटांसाठी 27 जानेवारी रोजी मतदान पार पडले. त्यातील अंतिम नॉमिनेशनची घोषणा आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार लॉस एंजिल्समध्ये डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 94वा ऑस्कर अवॉर्ड 27 मार्चला पार पडणार आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या ऑस्कर अवॉर्डमध्ये पात्र चित्रपटांच्या यादीत मागच्या वर्षांच्या यादीपेक्ष कमी चित्रपटांची नावे आहेत. मागील वर्षी एकूण 399 चित्रपटांनी ऑस्करमध्ये स्थान मिळवले होते.


हेही वाचा –  Oscar मध्ये ‘जय भीम’ आणि ‘मरक्कन’ करणार भारताचे प्रतिनिधीत्व

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -