Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन Oscar 2022 : ...म्हणून ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या लगावली कानशिलात

Oscar 2022 : …म्हणून ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या लगावली कानशिलात

Subscribe

यादरम्याने क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्यावर काहीतरी कमेंट्स केली. मात्र या कमेंटमुळे विल भडकला आणि त्याने चक्क स्टेजवर येऊन क्रिस रॉकच्या कानशिलात भडकवली.

जगप्रसिद्ध आणि सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिस येथे सुरु आहे.तब्बल तीन वर्षांनंतर हा पुरस्कार सोहळा पार पडतोय. या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. तर कलाविश्वातील अनेकांचे लक्ष या पुरस्कार सोहळ्याकडे आहे. मात्र या पुरस्कार सोहळ्यादरम्यान हाणामारी पाहायला मिळाली. सुपरस्टार विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉक यांच्यात ऑस्कर टेलीकास्टदरम्यान वैयक्तिक वाद झाला. क्रिस रॉक यावेळी स्टेजवर डॉक्यूमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यासाठी आला होता. यादरम्यान क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्यावर काहीतरी कमेंट्स केली. मात्र या कमेंटमुळे विल भडकला आणि त्याने चक्क स्टेजवर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात भडकवली.

- Advertisement -

या घटनेमुळे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित सर्वांनाच शॉक बसला. क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडाला तिच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला G.I Jane 2 हा चित्रपट मिळाला होता अशी कमेंट केली. ज्यामुळे विल भडकला आणि त्याने रॉकच्या कानाखाली वाजवली. यावेळी विल स्मिथने तू माझ्या पत्नीचे नाव तुझ्या तोंडून पुन्हा घेऊ नकोस असा इशारा दिला. जो रॉकनेही माफी मागत मान्य केला. या घटनेची मात्र सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचे अनेक व्हिडिओ आता ट्विटर, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर विल आणि रॉक दोघेही ट्रेंड होऊ लागले.

दरम्यान विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ ही Alopecia नावाच्या आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे डोक्यावर टक्कल पडते. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत. अशा परिस्थितीत तिची केलेली मस्करी विल स्मिथला अजिबात आवडली नाही आणि त्याने थेट जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात भडकवली.

- Advertisement -

दरम्यान यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथला किंग रिचर्ड या चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांची कशा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल भावूक झाल्याचं पहायला मिळालं.


वैफल्यग्रस्त माणसं आणि त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो; राऊतांची पडळकर अन् सोमय्यावर टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -