Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन Oscar Award 2023: 'RRR' आणि 'काश्मीर फाईल्स'ला मागे टाकत गुजराती चित्रपट 'छेलो...

Oscar Award 2023: ‘RRR’ आणि ‘काश्मीर फाईल्स’ला मागे टाकत गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ ला नामांकन

Subscribe

दरवर्षी स्थानिक भाषेतील चित्रपट ऑस्कर अकादमीच्या सर्व सदस्य देशांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पाठवला जातो.

दिग्दर्शक नलिन यांचा गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ (द लास्ट फिल्म शो) पुढील वर्षीच्या म्हणजेच २०२३ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी स्थानिक भाषेतील चित्रपट ऑस्कर अकादमीच्या सर्व सदस्य देशांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पाठवला जातो. या चित्रपटांपैकी कोणतेही पाच चित्रपट अंतिम टप्प्यात पोहोचतील आणि या पाच चित्रपटांना ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी नामांकन दिले जाईल.

हे ही वाचा – कंगना कुटुंबीयांसोबत पोहोचली वृंदावनात; घेतलं श्रीकृष्णांचं दर्शन

- Advertisement -

दिग्दर्शक नलिन मेहता यांचा पुरस्कार विजेता चित्रपट

दरवर्षी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाची ज्युरी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशातील सर्व भाषांमधील निवडक चित्रपटांमधून एक चित्रपट पाठवते. नलिन मेहता दिग्दर्शित या चित्रपटात भाविन रबाडी, भावेश श्रीमाली, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात किशोरवयीन मुलाच्या रुपेरी पडद्यावरील स्वप्नांची कथा दाखविण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाला वॅलाडोलिड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्ड स्पाइक पुरस्कारसुद्धा मिळाला होता.

- Advertisement -

‘RRR’ आणि ‘काश्मीर फाइल्स’ची बरीच चर्चा झाली.

या वर्षीच्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेश होण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेत असलेले दोन चित्रपट म्हणजे तेलुगू चित्रपट ‘RRR’ आणि हिंदी चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’. ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या बाजूने अनेक दिवसांपासून मोहीमही सुरू आहे आणि तो ऑस्करसाठी पाठवण्याच्या बाजूने सर्व देशी-विदेशी चित्रपट निर्माते वेळोवेळी निवेदने देत आहेत. मात्र, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी त्यावर कोणताही परिणाम न होता पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘छेलो शो’ या चित्रपटाची निवड केली आहे.

हे ही वाचा – शूटिंग संपवून फिरायला निघालेल्या इम्रान हाश्मीवर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक

आतापर्यंत केवळ तीनच चित्रपट Top 5 मध्ये पोहोचले

गेल्या वर्षी, दिग्दर्शक पी एस विनोदराज यांचा तामिळ चित्रपट ‘कोझंगल’ भारताची अधिकृत एंट्री म्हणून पाठवण्यात आला होता, परंतु हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीतील शेवटच्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. भारताने पाठवलेल्या चित्रपटांपैकी आतापर्यंत फक्त तीनच चित्रपट ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ हे ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या श्रेणीत नामांकन मिळवण्यात शेवटच्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकले आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -