घरताज्या घडामोडीअभिनेत्री विद्या बालन आणि एकता कपूरला ऑस्करचे निमंत्रण

अभिनेत्री विद्या बालन आणि एकता कपूरला ऑस्करचे निमंत्रण

Subscribe

ऑस्कर मतदान २०२१च्या यादीत ४५ टक्के स्रीयांचा समावेश

जगभरात महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुस्करासाठी अभिनेत्री विद्या बालन आणि निर्माती एकता कपूर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. (Oscar invitation to actress Vidya Balan and Ekta Kapoor)  अभिनेत्री विद्या बालन हिने नेहमीच प्रेक्षकांना वेगळ्या थाटणीचे सिनेमे दिले आहे. विद्या आणि एकता कपूर हिला अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अँन्ड आर्ट सायन्सने आपल्या समितीमध्ये सामिल करुन घेतले आहे. या समितीमध्ये जगभरातील ३९५ कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेमांशी जोडलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्या बालन आणि एकता कपूर हिला अॅकडमीतर्फे निवडण्यात आलेल्या सिनेमांसाठी वोटींग करण्याचा अधिकार मिळाला आहे. विद्या आणि एकदा कपूर यांच्यासोबत शोभा कपूर यांना देखील ऑस्करतर्फे आमंत्रण देण्यात आले आहे.

- Advertisement -

ऑस्कर मतदान २०२१च्या यादीत ४५ टक्के स्रीयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्या बालन आणि एकता कपूर यांच्याआधी ऑस्करसाठी मतदान करण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या रॉय, सलमान खान, दीपिका पादुकोन,इरफान खान,अमिताभ बच्चन, आमिर खान यांना देखील अधिकार देण्यात आले होते.

- Advertisement -

मागील काळत अभिनेत्री विद्या बालन प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली आहे. काही दिवसांपूर्वी रिलिज झालेल्या ‘शेरनी’ या सिनेमामुळे विद्याबालन पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली आहे. शेरनीमधील विद्याच्या अभिनयाची प्रेक्षकांची दखल घेत तिचे प्रचंड कौतुक केले आहे. तर निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी देखील बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत.  गेल्या काही वर्षात ‘वन्स अपॉन अ टाइन इन मुंबई’, ‘उडता पंजाब’, ‘द डर्टी पिक्चर’ यांसारख्या अनेक दमदार सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे.


हेही वाचा – यामुळे अभिनेत्री यामी गौतमला EDचा दुसऱ्यांदा समन्स

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -