Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ऑस्कर 2023 साठी चाहते उत्सुक; 'अवतार द वे ऑफ वॉटर' आणि 'द...

ऑस्कर 2023 साठी चाहते उत्सुक; ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ आणि ‘द फेबलमन’ यांसारखे चित्रपट शर्यतीत

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. जगभरातील प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये भारतातील ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यालाही ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. याआधी या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ देखील मिळाला आहे. यामुळे हे गाणं ऑस्कर अवॉर्डही जिंकेल, अशी अनेकजण आशा व्यक्त करत आहेत.

याआधी चित्रपटाशी संबंधितील कलाकार अमेरिकेत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले होते. यामध्ये राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि एसएस राजामौली हे होते.

- Advertisement -

या वर्षीच्या ऑस्कर 2023 साठी अनेक चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. यामध्ये टॉप गन मॅव्हरिक, अवतार द वे ऑफ वॉटर, द फेबलमन, वुमन टॉकिंग, ऑल क्वाएट ऑन द वेस्ट फ्रंट, एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स या चित्रपटांचा समावेश आहे. यामुळे यावेळचा ऑस्कर पुरस्कार पूर्वीपेक्षा अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे.

यंदाचा ऑस्कर सोहळा 95 वा असून यामध्ये पहिल्यांदाच रेड कार्पेटऐवजी चमकदार पांढरा रंग निवडण्यात आला आहे. लॉस एंजेलिस येथे 13 तारखेला सकाळी 5:30 वाजल्यापासून भारतात ऑस्कर अवॉर्ड्स थेट पाहता येणार आहे.

ऑस्करमध्ये दिसणार दीपिका पादुकोण

- Advertisement -

‘RRR’ व्यतिरिक्त, इतर दोन भारतीय चित्रपटांना ‘बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्री फिल्म’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीमध्ये कार्तिकी गोन्साल्विसचे ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ आणि शौनक सेनचे ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ यांचा यात समावेश आहे. ऑस्कर 2023 चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील ऑस्करमध्ये दिसणार आहे. याबाबत दीपिकाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती दिली होती.

 


हेही वाचा :

ऑस्कर 2023 ची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहाल?

- Advertisment -