कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ नुकताच लॉस एंजिलिसमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात यंदा भारताला संधी होती. मात्र, पुन्हा एकदा भारत ऑस्करला मुकला. यावेळी भारताकडून केवळ ‘अनुजा’ या एकमेव लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मची ऑस्करसाठी निवड झाली होती. पण सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीतून ‘अनुजा’ पराभूत झाला आणि व्हिक्टोरिया वॉर्मरडॅमच्या ‘आय ॲम नॉट अ रोबोट’ने बाजी मारली.
माहितीनुसार, ‘अनुजा’ची निर्मिती गुनित मोंगा, प्रियांका चोप्रा जोनास आणि मिंडी कलिंग यांनी केली होती. तसेच ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये ‘अनोरा’ या चित्रपटाने 5 विविध श्रेण्यांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. चला तर जाणून घेऊया इतर विजेत्यांची यादी. (Oscars 2025 the complete list of winners)
ऑस्कर विजेत्यांची यादी
श्रेणी : बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म
‘इन द शॅडो ऑफ द सायप्रेस’ – शिरीन सोहानी आणि हुसेन मोलायेमी
श्रेणी : बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म
‘फ्लो’ – गिंट्स झिलबालोडिस
श्रेणी : बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर
‘किअरन कल्किन’ – द रिअल पेन
श्रेणी : बेस्ट कॉस्च्युम डिझाइन
‘विकेड’ – पॉल टेझवेल
श्रेणी : बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले
‘अनोरा’ – शॉन बेकर
श्रेणी : बेस्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले
‘कॉनक्लेव्ह’ – पीटर स्ट्रॉघन
श्रेणी : बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग
‘द सबस्टन्स’ – पियरे ऑलिव्हियर पर्सिन, स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कार्सेली
श्रेणी : बेस्ट फिल्म एडिटिंग
‘अनोरा’ – शॉन बेकर
श्रेणी : बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस
झो सलदाना – ‘एमिलिया पेरेझ’
श्रेणी : बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन
‘विकेड’ – नेथन क्राऊली आणि ली सँडेल्स
श्रेणी : बेस्ट ओरिजिनल साँग
एल माल – ‘एमिलिया पेरेझ’
श्रेणी : बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म
‘द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा’ – मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन
श्रेणी : बेस्ट साऊंड
‘ड्युन पार्ट 2’ – गॅरेथ जॉन, रिचर्ड किंग, रॉन बार्टलेट आणि डग हेम्फिल
श्रेणी : बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स
‘ड्युन पार्ट 2’ – पॉल लॅम्बर्ट, स्टीफन जेम्स, रायस साल्कोम्बे आणि गर्ड नेफझर
श्रेणी : बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म
‘आय ॲम नॉट अ रोबोट’ – पॅट्रिस व्हर्मेट आणि शेन व्हियु
श्रेणी : बेस्ट सिनेमेटॉग्राफी
‘द ब्रुटलिस्ट’ – लॉल क्राऊली
श्रेणी : बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म
‘आय ॲम स्टिल हिअर’ – ब्राझिल
श्रेणी : बेस्ट ओरिजिनल स्कोअर
‘द ब्रुटलिस्ट’ – डॅनिअल ब्लुमबर्ग
श्रेणी : बेस्ट ॲक्टर
एड्रियन ब्रोडी – ‘द ब्रुटलिस्ट’
श्रेणी : बेस्ट डायरेक्टर
‘अनोरा’ – शॉन बेकर
श्रेणी : बेस्ट ॲक्ट्रेस
माईकी मॅडिसन – ‘अनोरा’
श्रेणी : बेस्ट पिक्चर
‘अनोरा’ – अॅलेक्स कोको, समांथा क्वान आणि शॉन बेकर
हेही पहा –
Kiara And Sidharth : गुड न्यूज दिल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसले एयरपोर्टवर