Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनOTT Release : OTT वर रिलीज होणार हे दमदार सिनेमे आणि सिरीज

OTT Release : OTT वर रिलीज होणार हे दमदार सिनेमे आणि सिरीज

Subscribe

थिएटरमध्ये सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांइतकीच घरबसल्या मनोरंजनाचा पर्याय निवडणाऱ्या प्रेक्षकांचीदेखील संख्या मोठी आहे. अनेकदा कामाच्या व्यापातून एखादा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणे शक्य होत नाही. अशावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा किंवा सिरीज पाहणे पसंत केले जाते. त्यामुळे बरेच प्रेक्षक एखादा नवा सिनेमा किंवा सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत असतात. चला तर जाणून घेऊया या आठवड्यात कोणकोणते सिनेमे तसेच सिरीज प्रदर्शित होत आहे. (OTT Release List Of Upcoming Films and Web Series)

1. जिद्दी गर्ल्स

‘जिद्दी गर्ल्स’ ही एक वेब सीरिज आहे. जी लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. समाजाच्या नियमांना आव्हान देणाऱ्या मुलींची गोष्ट यात पहायला मिळेल. 27 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थात उद्या ही वेब सीरिज प्रदर्शित होईल. यामध्ये नंदिता दास, रेवती, लिलेट दुबे, दिया दामिनी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

2. एक बदनाम आश्रम सीझन 3 – भाग 2

बॉबी देओल अभिनित ‘एक बदनाम आश्रम’ ही वेब सीरिज उद्या 27 फेब्रुवारी 2025 रोजी एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉबी देओलने ‘बाबा निराला’ ही निगेटिव्ह भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amazon MX Player (@amazonmxplayer)

या सीरिजच्या आधीचे दोन्ही सीझन प्रचंड गाजले. सिरीजमध्ये बॉबी देओल, त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, चंदन रॉय सान्याल हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

3. डब्बा कार्टेल

‘डब्बा कार्टेल’ ही वेब सीरिज येत्या शुक्रवारी 28 फेब्रुवारी 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. यातून पाच मध्यमवर्गीय महिलांची कहाणी दाखवली जाणार आहे. एक डब्बा व्यवसाय धोकादायक ड्रग्ज सिंडिकेटमध्ये अडकतो आणि नियंत्रणाबाहेर जातो. या महिला त्यांच्या निकटवर्तीयांचे रक्षण करण्यासाठी काय करतात? हे यात दाखवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

सीरिजमध्ये जबरदस्त अॅक्शन सीनदेखील आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन हितेश भाटियाने केले आहे. यामध्ये सई ताम्हणकर, शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, शालिनी पांडे, अंजली आनंद, जिशु सेनगुप्ता, लिलेट दुबे, आणि भूपेंद्र सिंग जदावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

4. लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन

लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक विनोद नावाच्या व्यक्तीवर आधारलेले आहे. जो त्याच्या स्वप्नातील घर बांधण्याचा निर्धार करतो आणि या स्वप्नासाठी अनेक आव्हानांचा सामना करतो. यात त्याच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. ज्या सिनेमाची रंजकता वाढवतात. या सिनेमाचे दिग्दर्शन विष्णू जी राघव यांनी केले आहे.

5. सुझल : द व्होर्टेक्स सीझन 2

‘सुझल : द व्होर्टेक्स’चा दुसरा सीझन येत्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे कथानक तामिळनाडूतील एका लहानशा गावाला हादरवून टाकणाऱ्या एका भयानक हत्येचे रहस्य उलगडणारे आहे. त्यामुळे रहस्य आणि गूढ कथांमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही सिरीज महत्वाची ठरेल.

6. संक्रांतिकी वास्तुनम

अॅक्शन, सस्पेन्स, थ्रीलर सिरीज आवडत असतील तर ‘संक्रांतिकी वास्तुनम’ ही वेब सीरिज नक्की पहा. येत्या 1 मार्च 2025 रोजी लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. याचे कथानक एका हाय-प्रोफाइल अपहरणावर आधारित आहे. व्यंकटेश दग्गुबाती, ऐश्वर्या राजेश, मीनाक्षी चौधरी, साई कुमार यांच्याबरोबरच मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेदेखील या सिरीजमध्ये झळकणार आहे.

हेही पहा –

Nutan Samarth Bahl : ‘मिस इंडिया’ बनणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री