बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास करोडोंची कमाई केली आहे.प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सनी देओलची सावत्र बहीण ईशा आणि आहना देखील फॅमिली स्पेशल स्क्रीनिंगमध्ये उपस्थित राहिल्या होत्या. यावेळचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावरुन देओल कुटुंबीय पुन्हा एकत्र आल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, अशातच आता हेमा मालिनी आपल्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी सांगताना दिसत आहेत.
View this post on Instagram
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, “मला खूप आनंदी आहे, पण मला असं वाटत नाही की यात काही नवीन आहे कारण हे खूप सामान्य आहे. कधीकधी सनी, बॉबी सर्वजण घरी येतात, परंतु आम्ही ते कुठेही पोस्ट करत नाही, आम्ही असे लोक नाही जे फोटो काढून लगेच इंस्टाग्रामवर अपलोड करु आमचे कुटुंब तसे नाही.”
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, “आमचे कुटुंब एकत्र आहे, आम्ही नेहमी सोबत आहोत. आम्ही नेहमी एकमेकांना साथ देतो, कोणतीही अडचण आली तरी आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. त्यामुळे यावेळी प्रेसला ते मिळाले आणि ते चांगले आहे, यामुळे ते देखील आनंदी आहेत आणि मी देखील आनंदी आहे.”
धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंबीय एकत्र आले
धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी सनी देओलचा चित्रपट ‘गदर 2’ याआधीच थिएटरमध्ये एका स्पेशल स्क्रीनिंगमध्ये पाहिला होता. ‘गदर 2’ च्या दुसऱ्या स्क्रिनिंगमध्ये सनी देओल आणि बॉबी देओलच्या सावत्र बहिणी ईशा आणि आहना देखील चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. हेमा मालिनी यांनीही या चित्रपट पाहिला आणि चित्रपटाचं कौतुक केलं. सध्या धर्मेंद्र यांची दोन्ही कुटुंब एकत्र आल्याने चाहते देखील आनंद व्यक्त करत आहेत. धर्मेंद्र यांनीही ईशा आणि आहानाचे सनी आणि बॉबीसोबतचे फोटो पाहून सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला होता.
हेही वाचा :