Video – विराट, अनुष्काला घटस्फोट दे! भाजप आमदराने केली मागणी!

काही दिवसांपूर्वी पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

anushka and virat
गेल्या वर्षी क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीदेखील इटलीत शाही लग्न थाटले होते

अभिनेत्री अनुष्का शर्मा गेले काही दिवस चर्चेत आहे ते तीच्य पाताललोक या वेबसिरीजमुळे. या वेबसिरीज प्रदर्शानंतर खूप चर्चा झाली. पण प्रदर्शनानंतर ही वेबसिरीज खूप वादात सापडली. साहाजिकच वेबसिरीजची निर्माती अनुष्का शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी गोरखा समाजाचा अपमान केल्यानं अनुष्का शर्मा कायदेशीर नोटीस पाठण्यात आल्यानंतर आता आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत गाझियाबादमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली आहे.

परवानगी न घेता वापरला फोटो

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आपल्या परवानगी शिवाय गुन्हेगारासोबत फोटो वापरल्यामुळे देशद्रोहाचा आरोप अनुष्कावर केला आहे. त्याचप्रमाणे गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे.  ‘देशापेक्षा कोणीही मोठं असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्याने देशाचे नाव मोठं केले आहे. तो देशभक्त आहे. मात्र अनुष्का या वेबसीरिजची निर्माती असून तिनं अशाप्रकारे देशद्राहाचं काम केलं आहे त्यामुळे विराटनं अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यायला हवा. अस त्यांन या मुलाखतीत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पाठवलेलं पत्र

नंदकिशोर गुर्दर यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रक जारी केलं होतं. या पत्रकात गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे. गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

‘अनुष्का शर्मा प्रोडक्शन’ आणि ‘सुदीप शर्माचं दिग्दर्शन’ असलेली पाताल लोक १५ मे रोजी ‘अमेझॉन प्राईमवर रीलीज’ झाली. ‘पाताललोक’मध्ये जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी, स्वस्तिका मुखर्जी, निहारिका, जगजीत, गुल पनाग या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


हे ही वाचा – TikTok : मुलीचे झाले ४ मिलियन फॉलोअर्स, भाजप नेता केक घेऊन पोहोचला घरी