Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन गोविंदा साकारणार मद्यसम्राट विजय मल्ल्या

गोविंदा साकारणार मद्यसम्राट विजय मल्ल्या

Subscribe

निर्माता पहलाज निहलानी आणि गोविंदा ३५ वर्षांनंतर एकत्र

पहलाज निहलानी पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांकडे वळले आहेत. सध्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यासाठी नाही तर मद्यसम्राट विजय मल्ल्यावर बनवत असलेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटासाठी निहलानी चर्चेत आहेत. या चित्रपटात विजय मल्ल्याची भूमिका गोविंदा साकारणार असून निहलानी आणि गोविंदा ३५ वर्षांनी एकत्र काम करणार असल्याची बातमी आहे.

चित्रपटाचं चित्रिकरण होणार ऑगस्टमध्ये सुरु

या चित्रपटाचं चित्रीकरण ऑगस्टमध्ये सुरु होणार असून गोविंदा प्रेक्षकांना नव्या अवतारात दिसेल अशी ग्वाही पहलाज निहलानींनी दिली. गोविंदाने सलमानबरोबर पार्टनर हा चित्रपट केल्यानंतर त्याला एकाही चित्रपटात आपली छाप पाडता आलेली नाही. हा चित्रपट कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या आयुष्यावर आधारित आहे. तर ‘किंगफिशर कॅलेंडर’ हा चित्रपटाचा मुख्य गाभा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मागच्या आठवड्यात यातील गाण्यांचे चित्रिकरण झाले असल्याची देखील बातमी आहे. मात्र या बातमीबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

गोविंदासाठी महत्त्वाचा चित्रपट

- Advertisement -

गोविंदा गेल्या बऱ्याच वर्षात बॉलीवूडमध्ये कोणताही धमाका करण्यात अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे ‘रंगीला राजा’ त्याला कितपत यश मिळवून देईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान विजय माल्ल्याने भारतातील बॅंकांकडून घेतलेलं कर्ज फेडलेले नाही. तो लंडनमध्ये असून मध्यंतरी त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनादेखील उधाण आले होते. पण अजूनही त्याला भारतामध्ये घेऊन येण्यात सरकारला यश मिळालेले नाही. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -