Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन मार्वलच्या सिरिज मध्ये झळकणार पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ?

मार्वलच्या सिरिज मध्ये झळकणार पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ?

यादीत फवाद खानचा फोटो देखील दिसत आहे. पेज वर दिलेल्या माहिती नुसार फवाद मिस मार्वलसिरिज मध्ये हसन नावाचे पात्र सकरणार आहे.

Related Story

- Advertisement -

‘जिंदगी गुलजार है’ या मालिकेमधून प्रसिद्ध झालेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आता मार्वलच्या सिरिज मध्ये झळकणार . आयरन मैन, ब्लैक विडो, कैप्टन अमेरिका सारख्या सुप्रसिद्ध सुपर हीरोची ओळख  जगाला करून देणार्‍या मार्वल स्टुडिओ आता लवकरच मिस मार्वल नावाची एक नवी कोरी टीव्ही सिरिज चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहे . या सिरिज मध्ये मार्वल सिनेमॅटीक युनिवर्स मध्ये पहिल्यांदा मुस्लिम अमेरिकन सुपरहिरोला दाखवण्यात येणार आहे. आणि आता अशीच बातमी समोर आली आहे की या सिरिज मध्ये अभिनेता फवाद खान देखील एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.फवाद खान बद्दल या बातम्या समोर येण्याचे कारण असे आहे की मिस मार्वलच्या IMDb मधील पेजवर त्याचे नाव अॅड करण्यात आले आहे. तसेच या यादीत फवाद खानचा फोटो देखील दिसत आहे. पेज वर दिलेल्या माहिती नुसार फवाद मिस मार्वल सिरिजमध्ये हसन नावाचे पात्र साकारणार आहे.

- Advertisement -

फरहान अख्तर सुद्धा सिरिज मध्ये झळकणार आहे-

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सुद्धा मार्वल स्टुडिओ मध्ये समाविष्ट झाला आहे. सध्या असे बोलण्यात येत आहे की फारहान सिरिज च्या कास्ट आणि क्रू सोबत बँकॉक मध्ये शूटिंग करत आहे. सिरिज मधील काही गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. मिस मार्वल एका पाकिस्तानी अमेरिकन टिनएजअर कमला खानची कथा आहे. कमला एक टिनएज सुपर हीरो आहे. जी कॅप्टन मार्वल याला खूप पसंत करते. अशी कथा मांडण्यात आली आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – नुसरत जहाँ होणार आई, पण याबाबत पतीला नाही माहित; भाजप नेत्याला करतेय डेट

- Advertisement -