भारतीय वधूप्रमाणे नटलेल्या पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्रोल होताच नेटकऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

पाकिस्तानातील अभिनेत्री उसना शाह हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ती तिच्या लग्नामध्ये एका भारतीय नववधूप्रमाणे नटली होती. ज्यामुळे तिला पाकिस्तानातील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खडेबोल सुनावले. पण याला अभिनेत्रीने देखील सडेतोड उत्तर दिले आहे.

Pakistani actress dressed Indian bride gave rude reply to netizens after being trolled

पाकिस्तानातील अभिनेत्री उसना शाह हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिने आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर देखील शेअर केला आहे. पण तिने तिच्या लग्नात घातलेल्या लाल रंगाच्या लेहंग्याची आणि तिने केलेल्या लूकची सर्वाधिक चर्चा होत आहे. पण तिच्या या लूकमुळे तिला तिच्या देशातील नागरिकांकडून ट्रोल देखील करण्यात येत आहे. भारतीय नवरीप्रमाणे नटल्यामुळे पाकिस्तानातील लोकांनी तिला सुनावले आहे. पण अखेरीस या अभिनेत्रीने आपले मौन तोडत तिला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना चांगलेच उत्तर दिले आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री उसना शाह हिने गोल्फ खेळाडू हामजा अमीन याच्यासोबत लग्न केले आहे. या नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. उसनाने तिच्या लग्नाच्या दिवशी लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, तसेच ती भारतीय नववधूप्रमाणे नटली होती. तिच्या लग्नात या जोडप्याने खूप मज्जा देखील केली असल्याचे तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. पण तिने तिच्या लग्नात परिधान केलेल्या पोशाखावर आणि तिने लग्नात केलेल्या नृत्यावर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तिने तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी तिला ट्रोल केले आहे. यावर पाकिस्तानी नेटकऱ्यांनी कमेंट लिहीत म्हंटले आहे की, पाकिस्तानी लोकांना आपली अशी संस्कृती आणि धर्म आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीला भारतात आणणे बंद करा. आपण मुसलमान आहोत आणि आपला धर्म असले कपडे परिधान करण्यास आपल्याला सांगत नाही. तर आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, आपल्या पाकिस्तानातील नववधू भारतीय संस्कृतीप्रमाणे का नटू लागल्या आहेत? ही आपली संस्कृती नाही.

हेही वाचा – राखी सावंत आता देणार अभिनयाचे धडे; दुबईत सुरू केली कार्यशाळा

दरम्यान, उसना शाहच्या पोस्टला अशा पद्धतीने कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांना अभिनेत्रीने चांगलेच सुनावले आहे. या अभिनेत्रीने इन्स्ट्राग्रामला पोस्ट शेअरव करत लिहिले आहे की, ज्या लोकांना माझ्या कपड्यापासून प्रॉब्लम आहे, त्यांना मी माझ्या लग्नात बोलावले नव्हते. तसेच मला ट्रोल करणा-या लोकांनी माझ्या लाल रंगाच्या लेहेंग्याचे पैसे देखील दिले नव्हते. मी घातलेले दागिने, लग्नातील कपडे हे पूर्णतः पारंपारिक आहे. त्यामुळे माझ्या लग्नात मी न बोलवता पोहोचलेल्या फोटोग्राफर्सना सलाम!

दरम्यान, पाकिस्तानातील लोकांना भारतातील प्रत्येक गोष्टीचे किती वावडे आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण काही भारतीय नागरिक असे देखील आहेत. जे कायमच भारताचे कौतुक करताना दिसत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिक हे भारताचे कौतुक करताना दिसत होते.