पाकिस्तान बॉर्डर ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मीडियामुळे पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि भारतातील सचिनची लव्हस्टोरी प्रचंड व्हायरल झाली. ज्यामुळे आता सीमा आणि सचिनची लव्हस्टोरी संपूर्ण जगभरात प्रचलित झाली आहे. शिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीमाला बॉलिवूडमधील एका चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर देखील मिळाली होती. अशातच, आता सीमा हैदरला प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमधून ऑफर आली आहे.
सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर
Seema Haider says she got offers from Bigg Boss, Kapil Sharma show #seemahaider #biggboss pic.twitter.com/IudzoOVTBB
— In Fact (@in__fact_) August 31, 2023
सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ साठी ऑफर देण्यात आली आहे. ज्याबाबत तिने स्वतः एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. ज्यात तिने सांगितल की, तिला बिग बॉस आणि कॉमेडी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. पण तिला सध्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही. जर कोणत्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती देईल, असंही तिने सांगितलं आहे.
सीमा- सचिनची लव्हस्टोरी चर्चेत
पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली होती. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर सीमा सचिनला भेटण्यासाठी आपल्या 4 मुलांसह नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली. यानंतर सीमाला 4 जुलै रोजी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.