Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमनोरंजनलाइव्ह शोमध्ये पाकिस्तानी गायिकेने सूत्रसंचालकाला बदडले!

लाइव्ह शोमध्ये पाकिस्तानी गायिकेने सूत्रसंचालकाला बदडले!

Subscribe

पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका शाझिया मंजूर हिने एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित सूत्रसंचालक आणि कॉमेडियन शेरी नन्हा यांना चांगलेच बदडवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अचानक लाइव्ह शोमध्ये घडलेला प्रकार पाहून अनेकांनी हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याची शंका व्यक्त केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सूत्रसंचालक शेरीने गायिकेला हनीमूनवरुन एक प्रश्न विचारला होता, ते म्हणालेले की, तुम्ही माझ्याशी लग्न कराल तर मी लगेच तुम्हाला मोंटे कार्लोला घेऊन जाईन. तुम्हाला विमानाच्या कोणत्या क्लासमध्ये जायचे आहे ते फक्त सांगा. त्यांचा हा प्रश्न ऐकून गायिकेचा राग अनावर झाला.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गायिका शाजिया मंजूर या लाईव्ह शोमध्ये अचानक होस्ट यांच्यावर भडकतात आणि त्याला कानाखाली मारतात. पुढे शाजिया म्हणतात, हनिमून म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? एखाद्या बाईशी हनिमूनबद्दल असं बोलतात का? मागच्या वेळीही तू असंच बोलला होतास आणि मग प्रॅंक केलाय असं म्हणत विषयाला वळण लावलं, मग मीही त्याला प्रॅंक असल्याचं म्हणाले होते. गेल्यावेळीही याने गैरवर्तन केलं होतं पण हे लोकांना माहित नव्हतं. तेव्हाही मी त्याला ओरडलेले.” हा सर्व प्रकार घडत असताना पडद्यामागे काम करणारे कर्मचारी धावत स्टेजवर येताना दिसतात आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला पण शाजिया या रागाच्या भरात स्टूडीओच्या बाहेर जातात.

 

यावर हैदर शेरीवर ओरडताना दिसतो आणि म्हणतो- शेरी, स्वतःच्या ओळी बोलू नकोस, स्क्रिप्टमध्ये जे लिहिले आहे तेच बोल. यानंतर, गायिका पुन्हा एकदा शेरीला मारण्यासाठी पुढे येते आणि हैदर तिला – आई आई म्हणत रोखण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतो. हैदरनेही गायिकेची सॉरी म्हणत माफी मागितली. या घटनेनंतर गायिका रागात बाहेर पडली. शोमध्ये पुन्हा काम करण्यास ती बिलकूल तयार नव्हती.

 व्हिडीओवर युजर्सच्या प्रतिक्रिया

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्क्रिप्टेड आहे का?” तर दुसऱ्याने, जगाने हे पाहून आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण, पाकिस्तानातील अशा रिॲलिटी शोमध्ये अशा घटना सर्रास घडल्या आहेत. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, हे पाहून मला कपिल शर्माची आठवण झाली.

कोण आहे शाजिया मंजूर?

शाजिया मंजूर या एक लोकप्रिय पाकिस्तानी गायिका आहे. त्या खूप जास्त पंजाबी गीत गातात. त्यांनी विविध प्रकारचे पंजाबी लोकगीत आणि पंजाबी सूफी कविता सुद्धा गायल्या आहेत. त्या कधी कधी उर्दू गाणी गातात.