पलक तिवारीची सलमान खानच्या बिग बजेट चित्रपटात एन्ट्री; या अभिनेत्यासह करणार अभिनय

palak tiwari cast in salman khan kabhi eid kabhi diwali handpicked by bhaijaan

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ ज्याचे टायटल आता ‘भाईजान’ करण्यात आले आहे. हा चित्रपट आता अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. यात स्टारकास्टमुळेही या चित्रपटाची विशेष चर्चा आहे. ‘बिग बॉस 13’ मधून प्रचंड लोकप्रिय झालेली शहनाज गिलला निर्मात्यांनी या चित्रपटात कास्ट केले आहे. यात आता सोशल मीडिया स्टार पलक तिवारीची (श्वेता तिवारीची मुलगी) चित्रपटातील स्टारकास्टमध्ये एन्ट्री झाल्याची माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी पलकची निवड स्वत: सलमान खानने केली आहे. पलक या चित्रपटात जस्सी गिलच्या ऑपोजिट दिसणार असून दोघांचाही एक उत्तम ट्रॅक असणार आहे. पलकने नुकतेच शूटिंगला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

मात्र पलक याविषयी अद्याप काहीही माहिती दिली नाही. फरहाद सामजी या चित्रपटात व्यंकटेश, पूजा हेगडे, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आदींसह अनेक कलाकार झळकणार आहे. दरम्यान पलकच्या एन्ट्रीमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. पलकने आत्तापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये तिच्या स्टाइलने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या मल्टिस्टारर चित्रपटातही चाहत्यांना त्याचे अभिनय कौशल्य पाहायला मिळणार आहे.

पलकने यापूर्वी सलमान खान आणि आयुष शर्माच्या ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस 15’ मध्ये सलमान खानसोबत स्टेज शेअर करताना दिसली होती.


‘रणवीर वर्सेस वाईल्ड विद बियर ग्रिल्स’मधून रणवीर सिंह करणार ओटीटीवर पदार्पण