श्वेता तिवारीच्या Second Pregnancy बद्दल कळल्यानंतर पलकची होती अशी रिअॅक्शन

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक ही सध्या बी-टाउनमध्ये नेहमीच चर्चेत असते. पलक हिने नुकतेच सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलीय. पलक तिवारीला अभिनयाचा वारसा तिच्या आईकडूनच मिळाला आबे. अशातच प्रत्येकाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुकता असते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलकने आपल्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. त्यावेळी तिने आई श्वेता तिवारी हिच्या सेकेंड प्रेग्नेंसी बद्दल बोलली. सिनेमाच्या कॅम्पेन दरम्यान तिने असे म्हटले की, मला आठवतेय की, मी खुप चिंतेत पडली होती जेव्हा आईने मला तिच्या सेकेंड प्रेग्नेंसी बद्दल सांगितले होते. मी त्यावेळी केवळ 15 वर्षांची होती आणि मला घरात आणखी एखाद बाळ नको होत.

पुढे तिने असे म्हटले की, आईने मला फसवल्यासारखे वाटत होते. मला तिच्या प्रेग्रेंसी बद्दल कळले तेव्हा सुरुवातीला नाहीच असे तिला म्हटले. मला कोणीही सांगितले नाही की बाळ आपल्या घरी येणार आहे. पलकची ही रिअॅक्शन पाहून श्वेता तिवारी आधी भडकली. परंतु सोनोग्राफीसाठी आईसोबत गेली असता ती भावनिक झाली.

पलक ही श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. तर श्वेताला दुसऱ्या लग्नानंतर एक मुलगा झाला. सध्या ती दुसऱ्या नवऱ्यापासून विभक्त झाली असून आता ती सिंगल मदर आहे.


हेही वाचा- ‘या’ कारणास्तव अजयच्या सिनेमातून शरमन जोशीचा पत्ता कट झाला होता?