अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत

सूत्रांच्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे निर्माते चित्रपटासाठी योग्य चेहऱ्याच्या शोधात होते. दरम्यान आता त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे.

बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रत्येक वर्षी कोणाच्या कोणाच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केले जातात. मागील काही दिवसांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार होणार असल्याची घोषणा झाली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता लोकांच्या मनाच प्रश्न निर्माण झाला आहे की, अटल बिहारी वाजपेयी मुख्य भूमिका नक्की कोण साकारणार आहे.

पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

सूत्रांच्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे निर्माते चित्रपटासाठी योग्य चेहऱ्याच्या शोधात होते. दरम्यान आता त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे.अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठी साकारणार असल्याची बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी याआधी शेरदिल चित्रपटात दिसून आले होते.

२०२३ मध्ये रिलीज होणार चित्रपट
विनोद भानुशाली, संदीप सिंह, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी हे या चित्रपटाची निर्मीती करणार असून २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्माते अटल बिहारी वाजपेयी यांचा हा जीवनपट २०२३ मध्ये त्यांच्या ९९ व्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहेत.

या नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
आत्तापर्यंत भारतातील अनेक नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आले आहेत. त्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात विवेक ओबेरॉय ने मुख्य भूमिका साकारली होती.तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.


हेही वाचा :…आणि रणवीर रस्त्यावरच झोपला; ‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीरने केला खुलासा