Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

Subscribe

पंकजा मुंडे यांच्या सोबत मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर पुरस्कार सोहळ्याचं निवेदन करताना दिसणार आहेत.

राजकीय पटलावर नेते मंडळी नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. निवडणूका, प्रचार, राजकारण या सगळ्यात राजकीय नेते मंडळी नेहमीच व्यस्त दिसतात. पण या सगळ्यातून काही नवीन करण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(bjp – pankja munde) या चक्क निवेदिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका पुरस्कर सोहळ्याचं निवेदन करताना पंकजा मुंडे दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या सोबत मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर(marathi actress kranti redkar) पुरस्कार सोहळ्याचं निवेदन करताना दिसणार आहेत.

हे ही वाचा – ‘बस बाई बस’च्या मंचावर पंकजा मुंडेंचा खेळकर अंदाज

- Advertisement -

झी मराठी(zee marathi) वाहिनीवर नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. यावर्षी देखील असाच एक दर्जेदार पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्त्री कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी ‘उंच माझा झोका'(unch majha jhoka award show) हा पुरस्कार सोहळा होणार आहे. ‘मला अभिमान आहे'(mala abhiman ahe) हे ब्रीदवाक्य घेऊन ‘उंच माझा झोका’ हा पुरस्कार सोहळा दिमाखात होणार आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. झी मराठी वाहिनीवर नेहमीच समाजातील विविध विषय घेऊन कार्यक्रम सादर केले जातात किंवा अतुलनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. म्ह्णूनच या वर्षी सुद्धा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळा २०२२ या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(pankaja munde) या पुरस्कार सोहळ्याचं निवेदन करताना दिसणार आहेत. तर अभिनेत्री क्रांती रेडकर(marathi actress kranti redkar) सुद्धा पंकजा मुंडे यांच्या सोबत निवेदन करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

हे ही वाचा –  पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्ट; वाढदिवसाच्या बॅनरवरूर भाजप नेत्यांचे फोटो गायब

‘उंच माझा झोका'(unch majha jhoka) पुरस्काराचे यंदाचं हे आठवं वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. ह्यावर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहेत. रविवारी 28 ऑगस्ट 2022 संध्याकाळी 7 वाजत प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – निवडणुकांना तत्काळ स्थगिती द्यावी, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंची सरकारकडे मागणी

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -