Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी विरुष्का लेकीसह इंग्लंड दौऱ्यावर,विमानतळावर वामिका पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद

विरुष्का लेकीसह इंग्लंड दौऱ्यावर,विमानतळावर वामिका पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद

वामिका आई बाबा विरुष्कासोबत इंग्लंडला रवाना होत असतानाच पापाराझींनी पुन्हा एकदा त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्न केला.

Related Story

- Advertisement -

चाहत्यांची लाडकी जोडी विराट कोहली (virat kohli)  आणि अनुष्का शर्मा (Anushka sharma) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  दोघेही आता आई बाबा झाले आहेत. नुकताच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला रवाना झाला. त्यावेळी अनुष्काही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत इंग्लंडला रवाना झाली आहे. विरुष्का (Virushka) आणि त्यांची लेकही त्यांच्यासोबत इंग्लंडला रवाना झाली आहे. विरुष्काच्या लेकीची वामिकाची (Vamika) पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच आतूर आहेत. आता तर वामिका इंग्लंडला निघाली म्हटल्यावर पापाराझींच्या (Paparazzi) कॅमेऱ्यापासून कशी वाचेल. वामिका आई बाबा विरुष्कासोबत इंग्लंडला रवाना होत असतानाच पापाराझींनी पुन्हा एकदा त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्न केला. वामिकाची हलकीशी झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Paparazzi captured Virushka ans daughter Vamika on camera at airport )

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


विराट अनुष्का बस मधून उतरुन विमानतळाच्या दिशेने जात असताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात तिघेही कैद झाले आहेत. यावेळी अनुष्का आपल्या लेकीला कवेत घेऊन कॅमेरापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसली तरीही पापाराझींच्या कॅमेऱ्यात वामिकाची हलकी झलक कैद झालीच. विरुष्काने लेकीचा जन्म झाल्यापासून तिला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. विराट आणि अनुष्काने स्वत: सर्व माध्यमातील व्यक्तींना आणि कॅमेरामन यांना मुलीचे फोटो न काढण्यासाठी पत्र पाठवले होते. ते त्यांच्या मुलीला सोशल मीडियावर आणू इच्छित नाहीत असे सांगण्यात आले. मात्र तरिही अनेक वेळा विरुष्काच्या मुलीचे वामिकाचे फोटो काढण्यासाठी पापाराझी आणि इतरांचा प्रयत्न सुरुच असतो.

- Advertisement -

११ जानेवारी रोजी विराट अनुष्काला वामिका हे कन्यारत्न प्राप्त झाले. वामिकाची पहिली झलक पाहण्यासाठी विरुष्काचे फॅन्स आतुर आहेत. मात्र दोघांनी आपल्या लेकीला लाइम लाईटपासून दूर ठेवले आहे. अलीकडेच विराटने मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही दोघांनी आमच्या मुलीला वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोवर तिला सोशल मीडिया म्हणजे काय हे कळत नाही तोपर्यंत तिचा चेहरा किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही,असे विराटने सांगितले.


हेही वाचा – बिगबॉस फेम प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

- Advertisement -