घरमनोरंजनसुशांतची हत्याच झाली; आत्म्याशी बोलल्याचा पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा!

सुशांतची हत्याच झाली; आत्म्याशी बोलल्याचा पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा!

Subscribe

सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता, ही हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या जगाला निरोप देऊन बरेच दिवस उलटून गेले आहे. सुशांतच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही. सुशांतने अचानक एक्झिट घेतल्याने त्याने खरंच डिप्रेशनमध्ये असल्याने स्वतःचे जीवन संपवले की त्याची कोणी हत्या केली, असे अनेक प्रश्न समोर आले आहे. परंतु पोलीस कोणत्याही ठाम निष्कर्षावर पोहोचलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात अनेकांची चौकशी सध्या होत आहे तर त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेताना दिसताय त्यापैकीच एक पॅरानॉर्मल रिसर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पॅरानॉर्मल रिसर्चचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूसंदर्भात पॅरानॉर्मल रिसर्चचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ इंडिया-युके-युएसएच्या एका व्यक्तीने प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत चर्चा केली होती, त्या चर्चेचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

एक्स्पर्टनी केला असा दावा…

आम्ही सुशांतच्या आत्म्यासोबत बोललो. यावेळी सुशांतने स्वत: त्याची हत्या झाल्याचे सांगितल्याचा दावा या व्हिडिओतील एक्स्पर्ट करत आहेत. सुशांतला कोणी मारले, हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. पण सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता, ही हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, एवढे मात्र आम्ही सांगू शकतो. आम्ही लवकरच सत्य आणून काढून सुशांत व त्याच्या चाहत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे ही एक्स्पर्टनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

या एक्स्पर्टनी केलेल्या या सर्व दाव्यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही गोष्टींचा आधार घेऊन सत्य समोर मांडण्याची धडपड करताना दिसताय हे मात्र तितकंच खरं आहे.


सुशांत आणि अंकिताचं ‘ते’ गाणं होतंय व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -