Parineeti Chopra: परिणीतीला राघव चढ्ढाने केलं किस, व्हिडिओ व्हायरल

Pareneeti chopra and raghav
Pareneeti chopra and raghav

लव्हबर्ड्स परिणीती चोपडा आणि राघव चढ्ढा यांचा नुकताच साखरपुडा सोहळा पार पडला. दिल्लीतील कपूरथलामध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. परिणीती आणि राघव यांच्या इनगेजमेंटची बातमी समोर येताच जोरदार चर्चा सुरु झाली. तसेच या कपल्सला शुभेच्छा ही दिल्या गेल्या.

या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत परिणीती आणि राघव ‘तेरे बिना दिल नईयो लगदा’ गाण्यावर लिप्सिंग करताना दिसून येत आहे. दोघे ही मस्तीच्या मूडमध्ये दिसून येत आहेत. याच दरम्यान, राघवने परिणीतीला सर्वांच्यासमोर गालावर किस केलं आणि तिला मिठी मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


प्रियंका चोपडा, अरविंद केजरीवाल यांच्यासह बॉलिवूड मधील काही कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी या दोघांच्या साखरपुड्याला उपस्थिती लावली होती. या दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्युट केमेस्ट्रीचे कौतुक केले जात आहे. राघव आणि परिणीती हे दोघे एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत आहेत.

साखरपुड्यावेळी दोघांनी एकसारख्याच रंगाचे आउटफिट्स घातले होते. परिणीतीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. तर राघवने आपला मामा पनव सचदेव द्वारे डिझाइन केलेली शेरवानी घातली होती. परिणीतीचा ड्रेस मोत्यांनी सजवण्यात आला होता आणि कश्मीरी थ्रेडवर्क दुपट्ट्यासह ड्रॉप डेड गॉर्जियस दिसून येत होती.


हेही वाचा- बांग्लादेशातही ‘पठाण’चा डंका; चित्रपटगृहातील व्हिडीओ व्हायरल