घरमनोरंजनबंगाल्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे परेश रावलवर कोलकातामध्ये गुन्हा दाखल; सोमवारी होणार चौकशी

बंगाल्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे परेश रावलवर कोलकातामध्ये गुन्हा दाखल; सोमवारी होणार चौकशी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा नेता परेश रावल मागील काही दिवसांपासून त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. परेश रावल यांनी आपल्या एका भाषणामध्ये बंगाल्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता कोलकात्यामध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून माकपा चे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांच्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिलांनी परेश रावल यांच्याविरुद्ध आयपीसीच्या विविध कलामांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्यांची चौकशी केली जाणार आहे. माकपाच्या नेत्याने आरोप केला की, “परेश रावल गुजरातमध्ये भाजपाच्या निवडणुक रॅलीमध्ये बंगाली समुदायाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केले होते.”

काय म्हणाले होते परेश रावल?
परेश रावल यांनी गुजरातमधील वलसाड येथे गुजराती भाषेत लोकांना संबोधित केले. महागडे गॅस सिलिंडर आणि रोजगाराच्या मागणीबाबत त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परेश रावल म्हणाले की, “‘गॅस सिलिंडर महाग असला तरी स्वस्त होणार आहे. लोकांना रोजगारही मिळेल, पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांग्लादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागल्यावर काय होईल. जसं दिल्लीत होत आहे. तेव्हा तुम्ही गॅस सिलेंडरचे काय कराल? बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?” या वक्तव्यानंतर परेश रावल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. तेव्हापासून अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.तृणमूस काँग्रेसने नेत्यांनी देखील याबाबात आवाज उठवला आहे.

- Advertisement -

परेश रावल यांनी मागितली होती माफी

दरम्यान, हे सर्व प्रकरण चिघळत असल्याचे पाहून परेश रावल यांनी त्यांच्या ट्वीट अकाऊंटवरुन माफी मागितली होती. त्यांनी ट्वीट करत लिहिलं होतं की, “मासे हा मुद्दा मुळीच नाही. कारण गुजराती देखील मासे खातात. पण मी हे स्पष्ट सांगू इच्छितो की बंगाली म्हणजे बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लीम जे इथे बेकायदेशीरपणे राहतात. पण तरीही तुम्हाला वाईट वाटले असेल तर मला माफ करा.”

- Advertisement -

 


हेही वाचा : 

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -