परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या एंगेजमेंटची तारीख आली समोर

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढा मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आले आहेत. ही जोडी यंदा ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, अशातच परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटची तारीख समोर आली आहे. येत्या 13 मे रोजी हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा 13 मे रोजी दिल्लीत ग्रँड एंगेजमेंट करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा एका फॅमिली फंक्शनमध्ये रोका पार पडला होता. यावेळी ते दोघेही खूप खूश होते.

परिणीतीच्या लग्नाला प्रियंका लावणार हजेरी

प्रियंका चोप्रा तिची बहीण परिणीतीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ऑक्टोबरमध्ये भारतात परतणार आहे. प्रियंका पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसह परिणीतीच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची बातमी चर्चेत आहेत. परिणीती आणि राघव मुंबईत लंच डेटवर स्पॉट झाले होते, त्यानंतर परिणीती आणि राघवच्या डेटिंगच्या बातम्या सुरु झाल्या. त्यानंतर दोघेही विमानतळावर एकत्र दिसले होते. राघव चढ्ढा किंवा परिणीती चोप्रा या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वृत्तावर मौन सोडलेले नाही.


हेही वाचा :

Mate Gala 2023 : प्रियंका चोप्राची पती निकसोबत शानदार एन्ट्री