Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन परिणीति चोपडाने इंटीमेट सीनबद्दल दिले स्पष्टीकरण,म्हणाली 'सीन कट म्हणजे कट'

परिणीति चोपडाने इंटीमेट सीनबद्दल दिले स्पष्टीकरण,म्हणाली ‘सीन कट म्हणजे कट’

मी खूप इंटीमेट सीन दिले आहे. यादरम्यान अनेकदा किसिंग आणि लवमेकिंग सीनचे शूटिंग करण्यात येते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्राच्या (Parineeti Chopra) वाटेला अद्याप कोणताही बिग बजेट सिनेमा आले नसले तरी तिने आपल्या अभिनयाने लोकांना चांगलेच प्रभावित केलं आहे. नुकतच परिणीतिचे तीन सिनेमा लगातार ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. तीनही चित्रपटात परिणीतीने केलेल्या अभिनयाचे समीक्षक तसेच चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. परिणीति नेहमी चित्रपटसृष्टीतील करियरबद्दल स्पष्टपणे मत मांडते. नुकतच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान परिणीतीला सिनेमात रोमॅंटिक आणि इंटीमेट सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे तिने हजर जबाबीने उत्तर देत आपले मत मांडले.

काय होता प्रश्न-

परिणीतिला विचारण्यात आले की,”कधी असे घडले आहे का रोमॅंटिक सीन चित्रित करताना तू त्यामध्ये खूप पुढे चालली गेली?(शूटिंग दरम्यान सीनमध्ये पात्रात स्वत:वरील ताबा सुटणे)”याचे अगदी समंजसपणे उत्तर देत परिणीति म्हणाली.”नाही,मी खूप इंटीमेट सीन दिले आहे. यादरम्यान अनेकदा किसिंग आणि लवमेकिंग सीनचे शूटिंग करण्यात येते. पण असे सीन ‘कट’ बोलताच त्याचा शेवट होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या सीनमध्ये शारीरिकतेने सहभागी होतात तेव्हा ते सीन खूपच क्लीनिकल आणि टेक्निकल असतात. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

- Advertisement -

 

- Advertisement -

वर्क फ्रंट बाबतीत बोलायचे झाल्यास परिणीतिचे चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवत आहे. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘साइना’,’संदीप और पिंकी फरार’ या सिनेमात परिणीति झळकली होती. ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या आगामी सिनेमात ती अजय देवगण सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे तसेच रणबीर कपूर सोबत मुख्य भूमिकेत ‘ऐनिमल’ सिनेमात परिणीतिची वर्णी लागली आहे.


हे हि वाचा – ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम तरला जोशींचे निधन

- Advertisement -