घरमनोरंजनParineeti Chopra :"आप गाने की जिद ना करो..."! पहिल्या लाइव्ह परफॅार्मन्सनंतर परिणीती...

Parineeti Chopra :”आप गाने की जिद ना करो…”! पहिल्या लाइव्ह परफॅार्मन्सनंतर परिणीती चोप्रा ट्रोल

Subscribe

बॅालीवुडमधील परिणीती चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. परिणीतीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. शुद्ध देसी रोमान्स, सायना, हंसी तो फंसी अशा चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परिणीतीने अभिनयानंतर आता संगीत क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच परिणीतीने गाणं गाण्याचा सराव करतानाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.

अभिनय क्षेत्रातून संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या परिणीतीचा नुकताच लाइव्ह परफॅार्मन्स मुंबईत पार पडला. या कॅान्सर्टमधील एक व्हिडिओ परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सोशल मीडियावर या परफॅार्मन्सचे फोटोज् आणि व्हिडिओज् व्हायरल होत आहे. परिणीती चोप्राने अभिनय क्षेत्रातून संगीत क्षेत्रात उतरायचं ठरवलं तेव्हापासूनच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. मात्र आताच्या तिचा लाइव्ह कॅान्सर्टनंतर अनेक लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

- Advertisement -

परिणीतीने तिच्या अकाऊंटवर कॅान्सर्टमधील एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत ती “आज जाने की जिद ना करो” हे गाण गाताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं. एकाने कमेंट करत “आप गाने की जिद ना करो” असं म्हटलं आहे. तर एकाने “तू चांगलं गातेस असं कोणी सांगितलं हिला?”, तर एकाने कमेंट करत आम आदमी पार्टीवरच निशाण साधला आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिलं, “कृपया गाणं थांबव, नाहीतर आप हरेल”, “आपल्यातले सुप्त गुण हे कधीच जगासमोर आणू नयेत, ते गुलदस्त्यातच ठेवावेत”अशी कमेंटही केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

- Advertisement -

एका ट्विटर अकाऊंटवरुनही परिणीतीच्या कॅान्सर्टमधील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ती ” मैं परेशान” हे गाण गात आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी तिची तुलना रानू मंडलशी केली आहे.

दरम्यान परिणीतीने 24 सप्टेंबर 2023 रोजी खासदार राघव चड्ढा यांच्याही लग्न करत संसार थाटला. परिणीतीच्या या लाइव्ह कॅान्सर्टसाठी राघव चड्ढाही उपस्थित होते, त्यांनीही परिणीतीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अनेक चित्रपटात तिने काम केलं आहे. लवकरच परिणीतीचा ‘चमकीला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंजाबचे प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -