बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये परिणीती चोप्राचे नाव घेतले जाते. ती शेवटची ‘अमर सिंह चमकीला’ या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा 2024 मध्ये लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमातील अभिनयासाठी परिणीतीचे फार कौतुक केले गेले. या सिनेमात तिने चमकीलाची पत्नी अमरजोतची भूमिका निभावली होती. या भूमिकेसाठी तिने बरंच वजन वाढवलं होतं. या सिनेमानंतर लवकरच परिणीती ओटीटी सिरीजमध्ये डेब्यू करणार आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. (Parineeti Chopra make her OTT debut with mystery thriller series)
View this post on Instagram
अभिनेत्री परिणीती चोप्राने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. लवकरच ती नेटफ्लिक्सच्या थ्रिलर मिस्ट्री सिरीजमध्ये झळकणार आहे. या सिरीजमध्ये तिच्यासोबत जेनिफर विंगेट, ताहिर राज भसीन, सोनी राजदान, अनुप सोनी आणि सुमित व्यास हे कलाकार दिसणार आहेत. या सिरीजबाबत माहिती देताना परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘काही रहस्ये फक्त उलगडत नाहीत – ती तुम्हाला आत ओढतात, तुम्हाला अंदाज लावतात आणि सोडून देण्यास नकार देतात. एक नवीन रहस्यमय थ्रिलर मालिका तयार होत आहे! टीम Netflix आणि आमचे श्रम तुम्ही पाहण्यासाठी आम्ही आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. शूटिंग सुरु झाले आहे… माझे OTT वर पदार्पण होत आहे’.
परिणीतीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ही एक मिस्ट्री थ्रिलर सिरीज आहे. त्यामुळे गूढ आणि रहस्यमय गोष्टींमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. सध्या तरी या सिरीजवर काम सुरू आहे आणि लवकरच या सीरिजचे नाव तसेच स्ट्रीमिंग डेटची घोषणा केली जाईल.
परिणीतीचा ‘अमर सिंह चमकीला’ गतवर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाला होता. ज्यात 80 च्या दशकातील पंजाबी रॉकस्टार अमर सिंह चमकीला यांची जीवनगाथा दर्शवली आहे. या सिनेमात चमकीला ही भूमिका दिलजीत डोसांजने साकारली होती. तर त्यांची पत्नी अमरजोत कौर या भूमिकेत परिणीती झळकली. या सिनेमानंतर जवळपास एक वर्षांनंतर ती आता सिरीजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते प्रचंड आतुरतेने तिच्या सिरीजची वाट पाहत आहेत.
हेही पहा –
Follower Movie : रॉटरडॅममध्ये गौरवलेल्या फॉलोअर चित्रपटाचा टीजर लाँच