Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'वॅक्सिन परदेशात मात्र अभिनय भारतात', परिणीती चोप्रावर उठली टीकेची झोड

‘वॅक्सिन परदेशात मात्र अभिनय भारतात’, परिणीती चोप्रावर उठली टीकेची झोड

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाचा कहर सुरु असल्याने लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बहुतांश सेलिब्रिटी वॅक्सिनेशनसाठी पुढे सरसावले आहेत. तसेच नागरिकांनाही वॅक्सिन घेण्याचे आवाहन करत आहेत. सध्या बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानेही लंडनमध्ये फायझर वॅक्सिनचा पहिला डोस घेतला. याचे काही फोटो परिणीतीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

परिणीतीनं सोशल मीडियावर फोटो शेयर करुन त्याला कॅप्शन दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, मी वॅक्सिन घेतली आहे. तसेच काही फोटो सुद्धा काढलेत. #Pfizer #London P.S.असं तिने लिहिले आहे, तिने फायझर कंपनीची व्हॅक्सिन घेतले असून परिणीतीचा तो फोटो तिच्या बहिणीनं म्हणजे प्रियंकानं काढला आहे. तसेच प्रियंका चोप्राला तिने हा फोटो टॅग केला आहे.

- Advertisement -

मात्र या वॅक्सिनेशन फोटोजमुळे परिणीतीवर युजर्सने टीकेची झोठ उठवली आहे. वॅक्सिन परदेशात आणि अभिनय भारतात. असे म्हणत युजर्स सध्या तिला ट्रोल करत आहेत. चिडलेल्या काही ट्रोलर्सनी तुला भारतीय वॅक्सिनवर भरोसा नाही का, तुला भारतात वॅक्सिन मिळाली नाही असे अनेक सवाल उपस्थित केले आहे. त्यामुळे परिणीतीने परदेशात जाऊन वॅक्सिन घेणे चाहत्यांना आवडलेले नाही.

- Advertisement -

परिणीतीच्या या फोटोवर एका युजर्सने कमेंट करत म्हटले की, “हे तुला भारी जमलयं परिणीती, फुकट लस मिळाली म्हणून परदेशात गेलीस.” तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, “परिणीतीला भारतीय वॅक्सिनवर विश्वास नाही म्हणून तिने परदेशी कंपनीची वॅक्सिन घेतली.” “सेलिब्रिटींनी पहिल्यांदा भारतीय वॅक्सिनला प्राधान्य दिल्यास बाकीचे लोकही देशाच्या वॅक्सिनला प्राधान्य देतील.” असे मत एका युजर्सने व्यक्त केले आहे.


SSC Result 2021: बैठक क्रमांकच माहित नाही? निकाल पाहू कसा ? वेबसाईटवर माहिती उपलब्ध


 

- Advertisement -