घर मनोरंजन परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा 'या' दिवशी करणार लग्न; रिशेप्शन कार्डचा फोटो व्हायरल

परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा ‘या’ दिवशी करणार लग्न; रिशेप्शन कार्डचा फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा नेता राघव चढ्ढाने 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट केली होती. काही बॉलिवूड कलाकार तसेच अनेक राजकीय नेते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव 23 ते 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. शिवाय त्यानंतर राघव आणि परिणिती चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये एक मोठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. त्यांच्या रिसेप्शनचे अधिकृत कार्ड देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परिणीती-राघवच्या रिशेप्शनचे कार्ड व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास येथे पार पडेल. या लग्नाला सुमारे 200 पाहुणे आणि 50 हून अधिक VVIP लोक उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. राजकारण्यांव्यतिरिक्त, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आणि त्यांची मुलगी मालती मेरी देखील उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान,  सध्या परिणीती आणि राघव लग्नासाठी खूप उत्सुक असून दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची जबरदस्त तयारी सुरु आहे. या लग्नात कुटुंबियांसोबतच परिणीती आणि राघवचे मित्र देखील उपस्थित राहतील.

 


हेही वाचा :

Photo : गोल्डन ब्युटी… मृणाल ठाकूरच्या फोटोवर चाहते फिदा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -