Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन राघव चड्ढासोबत एंगेजमेंट करण्यापूर्वी परिणीतीने केला होता मजेशीर करार

राघव चड्ढासोबत एंगेजमेंट करण्यापूर्वी परिणीतीने केला होता मजेशीर करार

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचा नेता राघव चड्ढा यांचा 14 मे रोजी दिल्लीतील कपूरथलामध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या साखरपुड्यातील एक इनसाइड व्हिडीओ समोर आळा आहे. ज्यामध्ये परिणीती राघव समोर एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट ठेवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

या व्हिडीओमध्ये परिणीतीने हातात माईक घेतला असून या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय की, “राघव चड्ढा यांच्याशी एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्टचा करार खालीलप्रमाणे आहे. तुम्हा सर्वांना हो म्हणावे लागेल आणि आम्ही पाहू हा रोका उद्या तरी कायम राहतोय की नाही. मी, राघव चड्ढा खालील गोष्टींशी सहमत आहे. नंबर एक, स्वीकार करा की, परिणीती नेहमी बरोबर असते.” परिणीतीचं हे वाक्य ऐकून उपस्थित सर्वजण हसू लागतात. त्यानंतर या व्हिडीओमध्ये राघव आणि परिणीतीच्या एंगेजमेंट सोहळ्याची झलक दाखवण्यात आली आहे.

अनेकदा एकत्र दिसल्याने सुरू झाली अफेअरची चर्चा

- Advertisement -

मागील काही महिन्यांपूर्वी हे दोघे सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले. याशिवाय हे मुंबई ते दिल्ली एकत्र प्रवास करतानाही दिसले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. ही जोडी यंदा ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एका फॅमिली फंक्शनमध्ये रोका पार पडला होता. यावेळी ते दोघेही खूप खूश होते.

 


- Advertisement -

हेही वाचा :

साराने केला ऑटोने प्रवास नेटकरी म्हणाले… ‘स्वस्तातलं प्रमोशन’

- Advertisment -