बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा 24 सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. पंजाबी पद्धतीने राजस्थानमधील उदयपूर येथे नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच आता परिणीतीने तिच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, ज्यामध्ये हे दोघेही क्रिकेट मॅच खेळताना दिसत आहे.
चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांचा क्रिकेट सामना
View this post on Instagram
परिणीतीने नुकतेच इंस्टाग्रामवर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राघव आणि परिणीतीने आपल्या कुटुंबीयांसोबत क्रिकेट आणि इतर खेळ खेळताना दिसत आहेत. यादरम्यानचा फोटो शेअर करत परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आमच्या पारंपरिक भारतीय लग्नाची सुरुवात करण्यासाठी, आमच्या अपारंपरिक चालीरीतींबद्दल करण्याची वेळ आली आहे.” या खेळात एका बाजूला टीम ग्रूम आणि दुसऱ्या बाजूला टीम ब्राइड होती.
परिणीती-राघवचे मुंबईत ग्रँड रिसेप्शन
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे, हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, या लग्नात एकही बॉलिवूड कलाकार उपस्थित नव्हता. त्यामुळे येत्या 4 तारखेला बॉलिवूड कलकारांसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी असणार आहे.
हेही वाचा :