घरमनोरंजनपरिणीती-राघव लग्नासाठी उदयपूरसाठी रवाना

परिणीती-राघव लग्नासाठी उदयपूरसाठी रवाना

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा नेता राघव चढ्ढाने 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट केली होती. काही बॉलिवूड कलाकार तसेच अनेक राजकीय नेते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, येत्या 23 ते 24 सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. 20 सप्टेंबर रोजी या दोघांचा विवाहपूर्व सोहळा दिल्लीत पार पडला होता. दरम्यान, आता या दोघांना शुक्रवारी रात्री दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

परिणीती-राघव उदयपूरसाठी रवाना

- Advertisement -

परिणीती आणि राघव सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. 20 सप्टेंबर रोजी या दोघांचा विवाहपूर्व सोहळा दिल्लीत पार पडला होता. 23 ते 24 सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. यासाठी नुकतेच हे दोघेही उदयपूरसाठी रवाना झाले. यावेळी दोघांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार लग्न

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास येथे पार पडेल. या लग्नाला सुमारे 200 पाहुणे आणि 50 हून अधिक VVIP लोक उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. राजकारण्यांव्यतिरिक्त, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आणि त्यांची मुलगी मालती मेरी देखील उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा : ‘बॅाईज-4’ मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -