बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा नेता राघव चढ्ढाने 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट केली होती. काही बॉलिवूड कलाकार तसेच अनेक राजकीय नेते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, आता लवकरच परिणीती आणि राघव 23 ते 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. शिवाय त्यानंतर राघव आणि परिणीती चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये एक मोठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी परिणीतीच्या रिसेप्शन कार्डचा एक फोटो व्हायरल झाला होता. अशातच आता राघव आणि परिणीतीच्या वेंडिग कार्डचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परिणीती-राघवच्या वेंडिग कार्डचा फोटो व्हायरल
परिणीती चोप्रा आणि राघवच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंगपासून ते रिसेप्शनपर्यंतची माहिती देण्यात आली आहे. या कार्डचा फोटो परिणीतीच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
200 पाहुणे लग्नाला राहणार उपस्थित
या लग्नाला सुमारे 200 पाहुणे आणि 50 हून अधिक VVIP लोक उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. राजकारण्यांव्यतिरिक्त, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आणि त्यांची मुलगी मालती मेरी देखील उपस्थित राहणार आहेत.