Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन माझ्या घरचे म्हणाले मुलगा शोध... परिणीतीचा साखरपुड्यातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल

माझ्या घरचे म्हणाले मुलगा शोध… परिणीतीचा साखरपुड्यातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचा नेता राघव चड्ढा यांचा शनिवारी दिल्लीतील कपूरथलामध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. सध्या सोशल मीडियावर परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या साखरपुड्यातील एक इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात परिणीती आणि राघल स्टेजवर मस्ती करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ परिणीती चोप्राच्या फॅन्स क्लबकडून त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव स्टेजवर उभे असून परिणीतीने माईक हातात घेतला आहे आणि तिच्या घरच्यांना विचारत आहे, “माझे कुटुंबीय अनेक वर्षांपासून म्हणत आहेत की तुझे लग्न कधी होणार, मुलगा शोध, आता हा ठीक आहे?” ज्याला चोप्रा कुटुंबाने होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर परिणीती तिच्या सासऱ्यांना विचारते, “आता चड्ढा, तुमची परवागणी आहे का?” चढ्ढा कुटुंबानेही आनंदाने होकारार्थी उत्तर दिले. परिणीती चोप्राचे बोलणे ऐकून राघव चढ्ढा लाजू लागतो.

- Advertisement -

यानंतर परिणीती चोप्राने मिका सिंगला लौंग गवाचा गाणं गाण्यास सांगते. त्यानंतर राघव आणि परिणीती स्टेजवर डांस सुरु करते. दरम्यान आता त्यांच्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. राघव आणि परिणीतच्या या क्यूट व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “ये परफेक्ट जोडी है.” तर तिथे आणखी एका युजरने लिहिले की, “दोघे एकत्र छान दिसत आहेत.”

अनेकदा एकत्र दिसल्याने सुरू झाली अफेअरची चर्चा

मागील काही महिन्यांपूर्वी हे दोघे सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले. याशिवाय हे मुंबई ते दिल्ली एकत्र प्रवास करतानाही दिसले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. ही जोडी यंदा ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एका फॅमिली फंक्शनमध्ये रोका पार पडला होता. यावेळी ते दोघेही खूप खूश होते.


- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -