परिणीतीच्या मुंबईतील निवासस्थानी रोषणाई; उद्या होणार एंगेजमेंट

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढा मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आले आहेत. ही जोडी यंदा ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटची तारीख समोर आली होती. येत्या 13 मे रोजी म्हणजेच उद्या हे दोघेही एंगेजमेंट करणार आहेत. त्यासाठी परिणीतीचे मुंबईतील घरही दिव्यांनी सजवण्यात आले आहे.

परिणीतीच्या एंगेजमेंटची तयारी सुरू

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

परिणीतीच्या मुंबईतील आलिशान घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतय की, तिच्या घरात एंगेजमेंटची तयारी सुरू झाली आहे आणि घराचा बाहेरील भाग अनेक दिव्यांनी सजवण्यात आला आहे. परिणीतीचे घर मुंबईतील वांद्रे भागात आहे. याआधी परिणीतीच्या एंगेजमेंट आउटफिटबद्दल एक मोठी माहिती समोर आली होती. परिणीतीच्या जवळच्या एका सूत्राने माहिती दिली होती की, ती तिच्या एंगेजमेंटमध्ये प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पोशाख घालणार आहे.

अनेकदा एकत्र दिसल्याने सुरू झाली अफेअरची चर्चा

मागील काही महिन्यांपूर्वी हे दोघे सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले. याशिवाय हे मुंबई ते दिल्ली एकत्र प्रवास करतानाही दिसले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. ही जोडी यंदा ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एका फॅमिली फंक्शनमध्ये रोका पार पडला होता. यावेळी ते दोघेही खूप खूश होते.

 


हेही वाचा :

‘तारक मेहत का उल्टा चष्मा’च्या रोशन भाभीचा निर्माते असितकुमार मोदींवर लैगिक छळाचा आरोप