घरमनोरंजनपॅरिस हिल्टन चौथ्यांदा भारत भेटीला !

पॅरिस हिल्टन चौथ्यांदा भारत भेटीला !

Subscribe

"जेव्हा मी भारतात फिरते तेव्हा स्थानिक डिझायनर्सचे कपडे परिधान करणे आणि त्यांना समर्थन देणे मला आवडते."- पॅरिस हिल्टन

संतोष खामगांवकर

बहूचर्चित अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टन बुधवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाली आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी मुंबई विमानतळावर तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यातील अनेकांनी तिच्या सोबत फोटो काढले. याबाबत तिने आपल्या चाहत्यांना निराश तर केले नाहीच, शिवाय या स्वागताने स्वतः पॅरिस एवढी आनंदित झाली की, अनेक चाहत्यांसोबतचे सेल्फी तिने तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आहेत. यावेळी जेंव्हा ती विमानतळावर उतरली त्यावेळी तिच्या हातात एक पोर्टेबल पंखा असल्याचे दिसून आले. या मागील नाकी गुपित काय याची सगळ्यांनाच उत्सुकता वाटत होती.

- Advertisement -

पॅरिस हिल्टन यापूर्वी तीन वेळा मुंबई दौऱ्यावर येऊन गेली होती . मागच्या दौऱ्यात तिच्या एका फॅशन ब्रँडची चेन लॉन्च करण्यासाठी आली होती. तर यावेळीही ती तिच्या नव्या उपक्रमासंदर्भात भेट देण्यासाठी मुंबईत आली आहे. भारतात आल्यावर गेल्या चोवीस तासांत काही भारतीय कलाकृतींच्या आणि बनावटीच्या कपड्यांमधील रिल्सही तिने अप्लाय इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केले आहेत. त्यावर ती म्हणते,”जेव्हा मी भारतात फिरते तेव्हा स्थानिक डिझायनर्सचे कपडे परिधान करणे आणि त्यांना समर्थन देणे मला आवडते. मी भारतीय डिझायनर्सच्या या कलाकृतींच्या प्रेमात आहे. ”

- Advertisement -

जगभर पॅरिसचे करोडो चाहते आहेत मात्र पॅरिस भारतीय अभिनेता सलमान खान याची चाहती असल्याचे बोलले जाते. सलमानच्या ‘भारत’ या चित्रपटादरम्यान त्याचा चित्रपटातील ‘पहिला लूक’ प्रसिद्धकेला गेला होता तेंव्हा पॅरिसने त्याचे खूप कौतुक केले होते. तिच्या २०१४ सालच्या भारत दौऱ्यादरम्यान ती सलमानला पुण्यात झालेल्या एका पार्टीमध्ये खास भेटलीही होती.

पॅरिसने भरतीच्या मागील भेटींदरम्यान झालेल्या मुलाखतींमधून भारतातील लोक आणि संस्कृती याबद्दल कौतुकोद्गार काढले होते. ती म्हणाली होती की , ” माझं भारतावर खूप प्रेम आहे. मला इथली माणसं, त्यांची संस्कृती आणि खास करून इथली खाद्यसंस्कृती एवढी आवडते की, मला पुन्हा पुन्हा भारतात यायला आवडेल. भारतातील या सर्व गोष्टी पाहून भारताबद्दलचं माझं मत पूर्णपणे बदललंय. मी लवकरच परत येईन.” आणि त्यानुसार पॅरिस हिल्टनने तिचा शब्द पाळलेला आहे. हे तिच्या पुनरागमनाने सिद्ध झाले आहे.


हे ही वाचा – मका पार्टी करत सनी देओलने मित्रांसोबत साजरा केला 65 वा वाढदिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -