मराठी प्रेक्षकांसाठी मालिका म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. या मालिकांची मेजवानी देणाऱ्या अनेक मराठी वाहिन्या सध्या उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे झी मराठी वाहिनी. झी मराठी ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. याच वाहिनीवर सुरू असलेली ‘पारू’ मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे
‘पारू’ मालिकेत अनुष्काच्या एन्ट्री नंतर सगळी गणितं बदलताना दिसतायत. अनुष्काच्या वागण्याने अहिल्यादेवी प्रभावित झाल्यात, आदित्य मध्ये ही बदल बदलाव दिसायला लागलाय. आदित्यला अनुष्काचा सहवास आवडायला लागलाय. आदित्य पहिल्यांदा पोलो नेक शर्ट घालून अनुष्कासोबत डिनरसाठी बाहेर पडतो. अनुष्कामुळे आदित्यमध्ये झालेला हा बदल अहिल्याला चांगला वाटतोय म्हणून अहिल्यादेवी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी ती अनुष्काकडे आदित्यशी नाते पुढे वाढवायला आवडेल का हा प्रश्न करते ? आदित्यच्या वाढदिवसाच्या दिवशी, अनुष्का आदित्यला सर्वांच्या उपस्थितीत पार्टीत प्रपोज करायचे ठरवते. त्यानंतर पारू, आदित्यपासून दूर राहू लागलेय. आदित्यला देखील पारूच्या वागण्यात बदल जाणवतोय.
आता अनुष्काच प्रोपोजल आणेल का पारू-आदित्यच्या नात्यात दुरावा ? अनुष्काला कळेल का पारूच्या गळ्यातल्या मंगळसूत्रा मागचं सत्य? बघायला विसरू नका ‘पारू’ झी मराठी वाहिनी वर
हेही वाचा : Swapnil Joshi : लक्षवेधी लूक आणि स्वप्नीलच्या जिलबी प्रोजेक्टची चर्चा !
Edited By – Tanvi Gundaye