‘खुद को कर बुलंद…’ ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानच्या ट्विटची चर्चा

pathaan controversy mp assembly speaker challenge will shah rukh khan watch pathaan with daughter besharam rang

सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांच्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेक जण शाहरूखच्या लूकची विशेष चर्चा करत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये 17 डिसेंबरला शाहरूखने ट्विटवर #asksrk सेशन ठेवले. ज्यात चाहत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पण यात किंग खान कुठे कमी पडला नाही. त्याने चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नांना तसचं उत्तर दिलं.

किंग खानचा शायराना अंदाज

शाहरुख खानवर प्रेम करण्याची चाहत्यांकडे अनेक कारणे आहेत. यात शाहरुख खान शायराना अंदाजावर चाहते असेच फिदा आहेत. #asksrk सेशननंतर सोशल मीडियावर शाहरूख खानच्या वागण्याची, शांत स्वभावाची चर्चा आहे. यात शाहरुख खानचे ट्विट खूप शेअर केले जात आहे. किंग खानला #asksrk सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारले होते की, सर अशी कोणती शायरी किंवा कोट जो तुमच्या मनात सारखा येतो?

या प्रश्नाला रिट्विट करत शाहरुख खान लिहिले की, ‘ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले, ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या.’ ‘पठाण’ वादात बॉलीवूडच्या बादशहाच्या या ट्विटने चाहत्यांच्या मनात घरं केलं आहे. या ट्विटची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

त्याचवेळी एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की, तुमच्या मुलांकडून तुम्हाला मिळालेली सर्वात चांगली प्रशंसा कोणती? ज्यावर सुपरस्टार शाहरूखने लिहिले की ‘पापा तुम्ही आमच्या ओळखीतील सर्वात दयाळू व्यक्ती आहात.

‘बेशरम रंग’ गाण्यावरून वाद सुरूच

12 डिसेंबरला ‘पठाण’चे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ रिलीज झाले. या गाण्यातील एका सीनदरम्यान दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याचे दिसतेय. अनेक हिंदू संघटनांनी दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीला विरोध केला. यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्याला कडाडून विरोध दर्शवण्यात येत आहे.

पिक्चर अभी बाकी है

शाहरुख खानला या सेशनमधून थेट प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. परंतु या सेशनमध्ये ज्यांच्या प्रश्नांची उत्तरे किंग खानने दिलेली नाहीत त्यांनी नाराज होऊ नका. कारण सेशन संपवताना शाहरुख खान म्हणाला की, तो लवकरच तुमच्या सर्वांमध्ये पुन्हा हजर होणार आहे, कारण ‘पिक्चर अभी बाकी है’.


ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर दोन बसची धडक; 3 प्रवासी ठार, 13 जखमी