‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुरळा; 20 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 20 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक सुपरहिट चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

20 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच कोट्यावधींची कमाई करण्यास सुरुवात केली आहे. आता जवळपास 20 दिवसानंतरही पठाणला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 364.15 कोटी कमावले असून दुसऱ्या आठवड्यात 94.15 कोटी कमावले. शिवाय 20 व्या दिवशी चित्रपटाने 4.50 कोटी कमावले आहेत. त्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने एकूण 493.65 कोटी कमावले आहेत. शिवाय जगभरातून या चित्रपटाने आत्तापर्यंत 950 कोटी कमावले आहेत. लवकर हा आकडा 1000 कोटीपर्यंत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे.


हेही वाचा :

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी – मधुबाला !