Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'या' दिवशी टीव्हीवर पाहता येणार 'पठाण'

‘या’ दिवशी टीव्हीवर पाहता येणार ‘पठाण’

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडत 1000 कोटी रुपयांची कमाई केली. अशातच, आता लवकरच ‘पठाण’चा भव्य टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

आता टीव्हीवर पाहता येणार ‘पठाण’

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Gold (@stargoldofficial)

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ 18 जून रोजी रात्री 8 वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार गोल्डवर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चॅनलने आपल्या सोशल मीडियावर अधिकृतपणे जाहीर केले आहे. स्टार गोल्डच्या सोशल मीडिया पेजेसने प्रीमियरचा घोषणेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ” ‘पठाण’च्या धमाकेदार पाहुणचार पाहण्यासाठी सज्ज व्हा. सर्वात मोठा ब्लॉकबस्टर प्रीमियर होणार आहे आणि तुमच्याप्रमाणे, आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही! ”

बांग्लादेशातही झाला ब्लॉकबस्टर

- Advertisement -

बांग्लादेशात जवळपास दशकभरात प्रदर्शित होणारा ‘पठाण’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. शिवाय येथील प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला. दरम्यान, ‘पठाण’ हा सिद्धार्थ आनंद आणि YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका यांच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे, तसेच सलमान खानचा कॅमिओ आहे. जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा ‘पठाण’ हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे.


हेही वाचा :

रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -