घरमनोरंजन'KGF 2' वर 'पठाण' पडला भारी 14 व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

‘KGF 2’ वर ‘पठाण’ पडला भारी 14 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 14 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक सुपरहिट चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

14 व्या कमावले ‘इतके’ कोटी

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 52.20 करोडोंची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले असून तिसऱ्या दिवशी 34 कोटी कमावले आहेत. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 51.50 कोटी तर पाचव्या दिवशी 58.50 कोटी कमावले. सहाव्या दिवशी 25 कोटी कमावले तर सातव्या दिवशी चित्रपटाने 22 कोटी कमावले आहेत. आठव्या दिवशी पठाणने 19.50 कोटी कमावले आहेत. तसेच नवव्या दिवशी 16 कोटी कमावले आहेत. 10 व्या दिवशी चित्रपटाने 13.50 कोटी कमावले आहेत तर 11 व्या दिवशी या चित्रपटाने 23 कोटी कमावले तर 12 व्या दिवशी या चित्रपटाने 28 कोटी कमावले आहेत तसेच 13 व्या दिवशी चित्रपटाने 9.5 कोटी कमावले आहेत. तसेच 14 व्या दिवशी या चित्रपटाने 9 कोटी कमावले असून आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 445.45 कोटींचा टप्पा पार केला आहेय. कमावले आहेत. जगभरातून या चित्रपटाने 849 कोटींचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

कियारा-सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांसाठी देशी नाश्त्याची सोय; जुही चावलाने शेअर केला फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -