घरमनोरंजनदीपिका, भगवी बिकीनी ते फिफा वर्ल्ड कप

दीपिका, भगवी बिकीनी ते फिफा वर्ल्ड कप

Subscribe

कतारमध्ये पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपचे अनावरण करण्याचा मान दिपिकाला देण्यात आला. यावरून दिपिकाचे चाहते आणि तिला ट्रोल करणारे यांच्यात सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरू झाले आहे.

पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दिपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरून देशात वाद सुरू आहे. भगवा हा रंग हिंदुत्वाशी जोडला गेला असून श्रद्धा आणि भक्तीचा तो रंग आहे असा दावा केला जात आहे. तसेच यावरून दिपिकालाही ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे रविवारी कतारमध्ये पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपचे अनावरण करण्याचा मान दिपिकाला देण्यात आला. यावरून दिपिकाचे चाहते आणि तिला ट्रोल करणारे यांच्यात सोशल
मीडियावर कोल्ड वॉर सुरू झाले आहे.

- Advertisement -

फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या आधी दिपिकाने वर्ल्ड कपचे अनावरण केले. यामुळे फिफाच्या इतिहासात विश्व कपचे अनावरण करणारी पहीली भारतीय महिला अशी दिपिकाची नोंद झाली आहे. फुटबॉलच्या जगात १८ डिसेंबर हा जसा अविस्मरणीय दिवस ठरला तसाच तो दिपिकासाठीही खास ठरला. दिपिकाने विश्व कपचे अनावरण माजी स्पेनिश गोलकिपर Iker Casillas याच्यासोबत केले. दिपिकाला मिळालेल्या या सन्मानामुळे भारतीयांची मानही गर्वाने उंचावली. यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. तर दुसरीकडे मात्र बिकीनीतील बेशरम रंग गाण्यावरून दिपिकाला लक्ष्य करणारे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना ट्रोल केले जात आहे.

यूजर्सनी मिश्रा यांनी आता फिफा वर्ल्ड कपवरच बहिष्कार घालायला हवा अशी उपहासात्मक टीका केली. तर दिपिकाला आज जे स्थान मिळाले त्याच्या आसपासही मिश्रा उभे राहू शकत नाहीत असे काहींनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -