‘पवित्र रिश्ता २’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला,चाहत्यांनी दिला सुशांतच्या आठवणींनी उजाळा

'पवित्र रिश्ता २' ही मालिका आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Pavitra Rishta 2 Serial in coming soon,fans light up Sushant Singh Rajput's memories
'पवित्र रिश्ता २' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला,चाहत्यांनी दिला सुशांतच्या आठवणींनी उजाळा

काही मालिका या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. छोट्या पडद्यावर अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक मालिका म्हणजे पवित्र रिश्ता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची मुख्य भूमिका या मालिकेत होती. प्रेक्षकांनी अक्षरश: मालिका डोक्यावर घेतली होती. कौटुंबिक विषयावरची मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर करुन आहे. आजही मालिकेचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या ओठावर आहे. अंकिता आणि मानवची जोडी आजही अनेकांच्या फोनचे वॉलपेपर आहे. आनंदाची बातमी म्हणजे पवित्र रिश्ता या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पवित्र रिश्ता २’ ही मालिका आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

पवित्र रिश्ता मालिकेला गेल्या वर्षीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडेने मालिकेचे पोस्टर शेअर केले होते. गेल्या वर्षीच अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. खरंतर सुशांत आणि अंकिता यांना पवित्र रिश्ता या मालिकेतून खरी ओळख मिळाली होती. दोघेही प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले होते. पवित्र रिश्ता २ ची चर्चा सुरु झाल्यानंतर चाहत्यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)


सध्या पवित्र रिश्ता २ च्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. मालिकेच्या भागांसाठी कामही सुरु करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मालिकेत अर्चनाची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडे करणार असल्याचे समजते आहे. तर मानवच्या जागी सुशांत ऐवजी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. नव्या अभिनेत्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. प्रेक्षक पवित्र रिश्ता २ पाहण्यासाठी आतुर आहेत. नव्या सीजनमध्ये काय पहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – अभिनेता सोनू सुदने चीन नंतर आता फ्रान्सकडून मागवले ऑक्सिजन प्लांट्स !