घरताज्या घडामोडीPavitra Rishta 2.0: ७ वर्षांनंतर पुन्हा 'पवित्र रिश्ता' मालिका प्रेक्षकांच्या भेटीस; शूटिंगला...

Pavitra Rishta 2.0: ७ वर्षांनंतर पुन्हा ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस; शूटिंगला झाली सुरुवात

Subscribe

७ वर्षांनंतर ‘पवित्र रिश्ता’ आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. मुंबईत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंग रविवारपासून सुरुवात झाली आहे. यामधील सर्व पात्रांची घोषणा केली आहे. यावर्षी एकता कपूर ही मालिका डिजिटल प्लेटफॉर्मसाठी आणत आहे. ज्यामध्ये मानवच्या भूमिकेत सुशांतच्या जागी अभिनेता शहीर शेख दिसणार आहे आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चनाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

अल्ट बालाजीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर रविवारी शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शहीर शेख अंकिता लोखंडेसोबत हातात क्लॅपबोर्ड घेऊन पोझ देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीसोबत शहीर शेखसोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कधी कधी आपल्या सामान्य जीवनात, आपल्याला सर्वात विलक्षण प्रेम कथ आढळतात. मानव आणि अर्चनाच्या विलक्षण प्रेम कथेचा साक्षी ‘पवित्र रिश्ता’च्या शूटिंगला सुरुवात होतेय. लवकरच अल्ट बालाजी स्ट्रीमिंग करेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

- Advertisement -

शूटिंग दरम्यानचे फोटो समोर आल्यामुळे आता चाहत्यांमध्ये एक वेगळाचं उत्साह वाढला आहे. चाहत्यांनी या फोटोंना खूप लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना लिहिले आहे की, ‘मालिकेत आम्ही सुशांतला खूप मिस करू, मात्र काही नाही शहीर पण इतकेचे चांगलं काम करेल.’ तर दुसऱ्या चाहत्याने असे लिहिले आहे की, ‘सुशांतची जागा कोणीच घेऊ शकत नाही. परंतु मी याला एक नवीन कथा मानेल.’ अजून एक चाहता म्हणाला की, ‘मला खात्री नाही की मी सुशांतशिवाय इतर कोणाला मानवच्या रुपात प्रेम करू शकतो, परंतु मी नवीन जोडी पाहण्यासाठी उत्साही आहे, जर ही एक नवीन कथा असती.’


हेही वाचा – ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनचा जोडीदार असणार ‘हा’ अभिनेता

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -